पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

53. आजचा शब्द 'सत्' (भाग २)

इमेज
  आधीच्या भागात आपण पाहिले की, सत् हे एक विशेषण आहे. त्याचा अर्थ असणारा, खरा, चांगला, साधू, योग्य, ब्रह्म.  आता या विशेषणाला जोडून येणारे इतर सामासिक शब्द पाहू. कर्म चांगले असेल तर सत्कर्म, चरित्र चांगले असेल तर सत् आणि चरित्र मिळून 'सच्चरित्र', वर्तन चांगले असेल तर सद्वर्तन. कुणी शीलवान असेल तर सत् + शील = सच्छील असा बदल होतो. 'सत्य' हे विशेषण आणि 'सत्त्व' हे नामही सत् पासूनच बनते. सत्त्व म्हणजे प्राण, प्राणी, खरेपणा इत्यादी. कागदपत्रांचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी ती सत्यापित म्हणजे अटेस्टेड केली जातात. अस्तित्व या अर्थाने 'सत्ता' हे स्त्रीलिंगी नाम सत् पासून तयार होते. आपले अस्तित्व दाखवण्याचा संघर्ष म्हणजे 'सत्तासंघर्ष' असतो. सत् ला त्र हे अव्यय लागले की 'सत्त्र' हे नाम बनते. लिहिताना मात्र ते 'सत्र' असे होते. सत्र म्हणजे अनेक दिवस अनेकांनी मिळून केलेला यज्ञ. उदाहरणार्थ जनमेजयाचे सर्पसत्र, प्रथम सत्र, चर्चासत्र, अन्नसत्र इत्यादी. अन्नसत्रचे नंतर अन्नछत्र झाले. सत् म्हणजे साधू आणि सती म्हणजे साध्वी. सत्पाल म्हणजे राजा किंवा चांगले...

8. बायपोलर। मन सुद्ध तुझं. भाग ८वा.

इमेज
  बायपोलर मन सुद्ध तुझं। भाग आठवा 'संगीत रणदुंदुभी' या नाटकात वीर वामनराव जोशींनी लिहिलेले एक पद आहे... जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा। गमे या भ्रांत संसारी ध्रुवाचा 'वेड' हा तारा।। जेथे मन आहे तेथे वेड आहेच. वेडाची टक्केवारी कमी जास्त असू शकेल, पण 'शहाणे मन' नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. मनाचा दुसरा स्वभाव म्हणजे ते सतत लंबकासारखे या टोकापासून त्या टोकाकडे हेलकावत राहते. अति करण्यात मनाला मजा वाटते. अति उपाशी राहणे किंवा अति खाणे. अति भटकणे किंवा अति एकांतवास. अतिउत्साह किंवा अतिनैराश्य. अशा या बायपोलर मनाचे स्वरूप उघड करणारा आठवा भाग 'मन सुद्ध तुझं' या मालिकेत येतो. ही मालिका सध्या एबीपी माझा वृत्तवाहिनीवरून दर रविवारी प्रसारित होते. अमोल महापात्रे नावाचे एक बिल्डर डाॅ. उदय देशपांडे यांच्या क्लिनिकमध्ये येतात. येतात म्हणण्यापेक्षा त्यांची पत्नी त्यांना बळजबरीने घेऊन येते. हे गृहस्थ येतानाच मोठमोठ्याने फोनवर बोलत येतात. अखंड बडबड करणारा आणि घाईत असणारा हा माणूस थेट डाॅक्टरांच्या केबिनमध्ये घुसतो. अतिशय उत्साहाने डाॅक्टरांनाच विचारतो की, "तुम...

52. आजचा शब्द 'सत्' भाग १.

इमेज
  सत् हे एक विशेषण आहे.  त्याचा अर्थ असणारा, खरा, चांगला, साधु, योग्य, ब्रह्म. व्यक्ती स्वभावाने चांगली असेल तर तिला आपण 'सज्जन' म्हणतो. सत् + जन = सज्जन असा हा शब्द तयार होतो. प्रातःकाल हा चांगला काळ असतो म्हणून त्याला सत् + काल = सत्काल म्हणतात. मराठीत तो 'सकाळ' झाला.  सत् चा विरुद्ध आहे असत्. सत् आणि असत् या दोन्हीमधील फरक ओळखण्याची बुद्धी म्हणजे विवेक. त्यालाच आपण 'सत् असत् विवेक' म्हणतो. परंतु संधीनियमाने तो शब्द 'सदसद्विवेक' असा लिहिला जातो. सच्चिदानंद या नावातही सत् चित् आनंद असे तीन शब्द आहेत. सत् आणि आनंद मिळून 'सदानंद' होतो. हे खंडोबाचे एक नाव आहे. मित्र चांगला असेल तर तो सत् मित्र असतो. पण संधीच्या नियमाने 'सन्मित्र' होतो. चांगला गुरू हा सद्गुरू असतो. चांगला गृहस्थ हा सद्गृहस्थ आणि चांगले आचरण सदाचरण असते. या सर्व शब्दांमध्ये त चे रूपांतर द मध्ये होते. (माणसाच्या तोंडावाटे उच्चार होतानाच हा बदल होतो म्हणूनच तसा नियम बनवला आहे.) चांगला मान द्यायचा असेल तर सत् + मान = सन्मान केला जातो. हिंदीत 'सम्मान' असे लिहितात. कारण त्...

51. आजचा धातू 'हृ'. भाग 2.

इमेज
  आधीच्या भागात आपण हृ धातू असलेले आहार, प्रहार, संहार, असे काही शब्द पाहिले. हृ म्हणजे नेणे, घेऊन जाणे. हा धातू आणखी काही उपसर्गांसोबत ज्या शब्दांमध्ये येतो ते आज पाहू. विहार म्हणजे खेळ, क्रीडा, सहल, क्रीडांगण आणि मठ. पक्षी आकाशात विहरत होते, आहारविहार उत्तम असावा किंवा बौद्धविहार, असा अनेक ठिकाणी 'विहार' हा शब्द भेटत राहतो.  अव हा उपसर्ग लागून 'अवहार' झाला की अर्थ बदलतो. अवहार म्हणजे तात्पुरता तह किंवा मागे येणे. याच अवहारला पुन्हा वि उपसर्ग लावला की वि+अवहार = व्यवहार असा शब्द बनतो. व्यवहार म्हणजे आपसातील देवाणघेवाण, व्यापार, लोकरीत. जी गोष्ट व्यवहारात आणणे शक्य नसते ती 'व्यवहार्य' नसते.  परि हा उपसर्ग वापरला की, 'परिहार' होतो. परिहार म्हणजे  दूर करणे. वैद्य रोगाचा परिहार करतो. जी अडचण दूर करता येते ती 'परिहार्य' असते. जी अडचण दूर करता येत नाही ती 'अपरिहार्य' असते.  उद् हा उपसर्ग लागलेला उद् +हार = उद्धार हा अत्यंत ओळखीचा शब्द आहे. वर ओढून काढणे, रक्षण करणे, संकटातून वाचवणे म्हणजे उद्धार करणे. मराठीत या उद्धाराला एक नकारात्मक छटाही आहे...

इमर्जन्सी. मन सुद्ध तुझं। भाग 7.

इमेज
  रस्त्यावर एखादा छोटासा अपघात झाला तरी त्यात जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी अपघाताला जबाबदार कोण? हे शोधून त्याला धोपटण्याची सरधोपट पद्धत आपल्याकडे आहे. जे घडले आहे ते जसेच्या तसे पाहता आले तरच खरी 'दृष्टी' लाभली असे म्हणता येईल. 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या सातव्या भागात आत्महत्या करू पाहणार्‍या अशाच एका आजीची गोष्ट येते. ही मालिका सध्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर सुरू आहे. क्लिनिक बंद करण्याच्या वेळेला म्हणजे रात्री मानसतज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. पलीकडून कुणीच बोलत नाही. फक्त हुंदक्यांचा आवाज. डाॅक्टरांच्या लक्षात येते की, पलीकडे कुणीतरी त्रस्त व्यक्ती आहे आणि तिला आपल्या मदतीची गरज आहे. फोन कट होतो.  त्या रात्री रीसर्च पेपर लिहिण्यासाठी डाॅक्टर दवाखान्यातच थांबतात. पुन्हा रात्री दोन वाजता तोच फोन येतो. या वेळी मात्र पलीकडून एक बाई बोलतात. त्या नाव, गाव आधी सांगत नाहीत, पण त्यांना आत्महत्या करायची आहे, असे सांगतात. हळूहळू डाॅक्टर त्यांना बोलते करतात तेव्हा कळते की, त्या सुनीता सबनीस आहेत. त्यांचा मुलगा व सून परदेशात नोकरी करतात. परंतु...

50. आजचा शब्द 'हृ'. भाग १

इमेज
  हृ या धातूचा अर्थ नेणे, घेऊन जाणे एवढाच असला तरी उपसर्ग लावल्यानंतर या धातूचे विविध अर्थ प्रकट होतात.  हृ चे नामरूप 'हरण' असे आहे. हरण करणे म्हणजे घेऊन जाणे. रावणाने सीताहरण केले होते. अप या उपसर्गामुळे 'अपहरण' असा शब्द बनतो. वाईट पद्धतीने पळवून नेणे म्हणजे 'अपहरण'. बँकेत पैसे काढण्याच्या काउंटरवर 'आहरण' लिहितात. पैसे काढून वाटणारा अधिकारी 'आहरण वितरण अधिकारी' असतो. मात्र हे पैसे त्याने स्वतःच खाल्ले तर पैशांचा 'अपहार' केला अशी बातमी येते.  सैनिक शत्रूवर 'प्रहार' करतात आणि देवीने राक्षसांचा 'संहार' केला असे म्हणतात. 'संहार'मध्ये सम् हा उपसर्ग आहे.  आ उपसर्ग वापरला की 'आहार' म्हणजे अन्न किंवा खाणे असा शब्द तयार होतो. यावरून 'निराहार' म्हणजे अन्न न खाणे, मिताहार म्हणजे कमी खाणे, फलाहार म्हणजे फळे खाणे (याचाच नंतर आपण 'फराळ' केला असावा.) आहार म्हणजे पूर्ण जेवण. मात्र उप+आहार मिळून 'उपाहार' शब्द बनतो. उपाहार म्हणजे पूर्ण जेवण न करता थोडासा नाष्टा करणे. त्यामुळे ज्या हाॅटेलमध्ये असे नाष...

49. आजचा शब्द 'जन्'.

इमेज
  जन् हा जन्मण्याचा धातू आहे. पण यातून जन्मणारे शब्द अतिशय रंजक आहेत. उत्पन्न होणे, उद्भवणे, होणे, घडणे, जन्म देणे, असे या धातूचे अर्थ आहेत. जन्म देते ती जननी आणि जनक म्हणजे बाप या आपल्या ओळखीच्या शब्दांमागे हाच धातू आहे. या जन् धातूमधील फक्त 'ज' हे उपपद वापरून अनेक सामासिक शब्द बनतात. जसे पंकज, नीरज, सहज वगैरे. पंक म्हणजे चिखल. चिखलात जन्मणारे कमळ म्हणजे 'पंकज'. नीर म्हणजे पाणी. पाण्यात उगवणारे कमळ म्हणजे 'नीरज'. सोबत उत्पन्न होते ते 'सहज'. केशर काश्मीरमध्ये पिकते म्हणून त्याला 'कश्मीरज' म्हणतात. अनुज म्हणजे तुमच्या नंतर जन्मलेला लहान भाऊ. अनुजा म्हणजे लहान बहीण. तुमच्या आधी जन्मलेला म्हणजे मोठा भाऊ असेल तर 'अग्रज'. कुसुमचा मोठा भाऊ म्हणजे 'कुसुमाग्रज' आणि गोविंदचा मोठा भाऊ असेल तर 'गोविंदाग्रज'. अग्रजा म्हणजे मोठी बहीण. तुमच्या घराण्यात 'पूर्वी' जन्मलेले सर्व जण तुमचे पूर्वज असतात. तर तुमच्या वंशात नंतर जन्मणारे 'वंशज' असतात. राज्यात जन्मलेले लोक म्हणजे 'प्रजा' आणि त्यांचा राजा 'जनदेव' असत...

48. आजचा शब्द 'अयन'.

इमेज
  अयन म्हणजे जाणे, मार्गक्रमण करणे, रस्ता, अर्धे वर्ष, मोक्ष, प्रवेशमार्ग. रामायण, दक्षिणायन, उत्तरायण हे शब्द आपल्याला माहीतच आहेत. रामाची उत्तरेकडून लंकेपर्यंत जाण्याची कथा म्हणजे रामायण. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा आस तिरका असल्यामुळे सूर्य आपल्याला कधी दक्षिणेकडे जाताना दिसतो. तर कधी उत्तरेकडे सरकताना दिसतो. यालाच सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणतात. याशिवाय प्रशमायन, पुरुषायण, समुद्रायण, स्वेदायन असे काही अपरिचित शब्दही आहेत. इंद्रियांचे शमन करणे किंवा त्यांना आवरणे हाच ज्याचा मार्ग आहे त्या मुनीला 'प्रशमायन' असे म्हटले जाते. जिवाचे आत्म्यात एकरूप होऊन जाणे म्हणजे 'पुरुषायण'. शरीरातून घाम बाहेर पडण्याचा मार्ग 'स्वेदायन' आणि नदीचे समुद्राकडे जाणे म्हणजे 'समुद्रायण' आहे.  आकाशातील नक्षत्रे किंवा राशी आकाशात मोजण्यास सुरुवात कोठून करावयाची यासाठी दोन पद्धती प्रचारात आहेत. निरयन आणि सायन पद्धती, अशी त्यांची नावे आहेत. यातही अयन आहेच. अयन म्हणजे प्रवेशमार्ग. या अर्थाने हा शब्द गीतेमध्ये आला आहे. अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः। या श्लोकात दुर्योधन...

47. आजचा शब्द 'मान'.

इमेज
  मान म्हणजे आदर, गौरव, गर्व, क्रोध, पुरावा, माप, सारखेपणा, विस्तार. याला विविध उपसर्ग लागून वेगवेगळ्या अर्थाचे शब्द तयार होतात. सन्मान, अपमान, अवमान, मानहानी हे तर खूपच ओळखीचे शब्द आहेत. परंतु परिमाण, प्रमाण, निर्माण या शब्दांतही 'मान' आहेच. एका नियमाने यात शेवटचा न बाणाचा ण झाला आहे. परिमाण म्हणजे वजन, संख्या, आकारमान. प्रमाण म्हणजे खरे तर पुरावा असा अर्थ आहे. हिंदी भाषेत प्रमाण म्हणजे पुरावा याच अर्थाने हा शब्द वापरला जातो. मात्र मराठीत प्रमाण म्हणजे टक्केवारी असा अर्थ झाला आहे.  अनुमान म्हणजे अंदाज आणि अनमान म्हणजे अनादर किंवा संकोच. अभिमान आणि स्वाभिमान असणे योग्य असले तरी त्यात दुष्टता शिरली तर तो दुराभिमान होतो. मान म्हणजे अहंकार आणि अहंकाराने आंधळ्या झालेल्या व्यक्तीर मानांध म्हणतात. अतिमान म्हणजे जास्त अहंकार. चाणक्यनीतिमध्ये एक श्लोक आहे... अतिदानात् बलिर्बद्धो अतिमानात् सुयोधनः।  (अतिदानामुळे बळी बांधला गेला, अतिमानामुळे दुर्योधन नष्ट झाला.) उपमान व उपमेय हे शब्द व्याकरणात नेहमीच सापडतात. ज्या वस्तूची उपमा दिली आहे तिला उपमान म्हणतात आणि ज्या वस्तूला ती उपमा दि...

46. आजचा शब्द 'गमन'.

इमेज
  गमन म्हणजे जाणे, गती, प्रयाण. आगमन म्हणजे येणे. निर्गमन म्हणजे निघून जाणे. गम् हा धातू या शब्दांमागे आहे. ज्या विषयात बुद्धी सहज प्रवेश करते तो विषय 'सुगम' असतो. जे संगीत सहज कळते ते 'सुगम संगीत'. पर्वतासारखा भाग जाण्यासाठी अवघड असतो म्हणून तो 'दुर्गम' असतो. पर्वतावर मंदिर असलेल्या देवीला त्यामुळेच 'दुर्गा' म्हणतात.  जी सतत पुढे जात राहते ती 'गंगा' असते. या नावामागेही गम् हाच धातू आहे. नदीचे नाव काहीही असले तरी 'गंगा' हे नदीसाठी वापरले जाणारे सामान्य नाम आहे. जसे गोदावरी नदीला आपण 'दक्षिण गंगा' म्हणतो.  जेथून नदीचा आरंभ होतो तो 'उगम' असतो आणि अनेक नद्या जेथे एकत्र येतात तेथे 'संगम' होतो.  आगम आणि निगम या शब्दांचा अर्थ वेद, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र असाही आहे. संत चोखामेळा एका अभंगात म्हणतात.. "आगमाची आढी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा।।" (आम्हाला काही कळत नाही, असे संत कितीही म्हणत असले तरी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व निर्विवाद आहे.) गम् धातूचे एक विशेषण 'गामी' असे आहे. 'गामी' ...

नो प्रिस्क्रिप्शन. मन सुद्ध तुझं। भाग सहावा.

इमेज
  मन सुद्ध तुझं । मागील रविवारचा सहावा भाग मला एक मित्र म्हणाला होता की, सरकारने प्रत्येकाच्या बँक खात्यात एकेक कोटी रुपये टाकले तर किती बरे होईल? त्यावर मी म्हणालो की, असे झाले तर कुणीच कुणासाठी काम करणार नाही. मुळात काम करण्याची प्रेरणाच नष्ट होईल. लोक आळशी आणि मंद होतील. माणसाची बुद्धी तेव्हाच काम करते जेव्हा तिच्यापुढे संकटे, आव्हाने उभी राहतात. आईवडिलांनी अशी सर्व संकटे आणि आव्हाने नष्ट केलेल्या एका मुलाची गोष्ट 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या सहाव्या भागात येते. ही मालिका सध्या एबीपी माझा वृत्तवाहिनीवर सुरू आहे. डाॅक्टर असलेले गायतोंडे हे दाम्पत्य आपला मुलगा समीरला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन येतात. समीर बारावी सायन्सला असतो. त्याचा सर्व उत्साह मावळला आहे आणि त्याला उत्साहाचे औषध द्या, असे त्याची आई म्हणते. समीरच्या पालकांनी त्याचा जन्मही मुहूर्त पाहून सिझेरियनद्वारे घडवलेला असतो. लहानपासूनच त्याचे आयुष्य आखीव-रेखीव करण्याच्या नादात वेळापत्रकाच्या दोराने समीरला करकचून बांधलेले असते. सकाळी पाच ते रात्री झोपेपर्यंत टेनिस, गिटार, शिकवणी, क्लासेसचा भडीमार सुरू असतो.  कसलाही संघर्...

45. आजचा शब्द 'जीर्ण'.

इमेज
  जीर्ण म्हणजे म्हातारपण, वृक्ष, जुने, पचलेले अन्न. खाल्लेले अन्न पचले की ते 'जीर्ण' होते. पचले नाही तर 'अजीर्ण' होते. म्हणजेच अपचन होते. पचनशक्तीला आयुर्वेदात जीर्णशक्ती म्हणतात. जुने, पडझड झालेले घर असेल तर त्याला 'जीर्णवाटिका' म्हणतात. जुनी इमारत नवी करायची असेल तर तिचा जीर्णोद्धार करतात. अंगात ताप बरेच दिवस मुरला की त्याला 'जीर्णज्वर' म्हणतात. "वासांसि जीर्णानि यथा विहाय। नवानि गृह्णाति नरोऽपराणि।। असा एक श्लोक गीतेमध्ये आहे. जीर्ण झालेले कपडे टाकून जसे लोक नवे कपडे धारण करतात तसे आत्माही जुने झालेले शरीर सोडून नवे शरीर धारण करतो. असा या श्लोकाचा अर्थ. जीर्ण हे जॄ धातूचे भूतकालवाचक विशेषण आहे. जॄ धातूपासून 'जर' असे नाम तयार होते. जर म्हणजे जुने होणे. जी कलाकृती कधीच जुनी वाटत नाही तिला आपण अजर + अमर = अजरामर कलाकृती म्हणतो. जरावस्था म्हणजे म्हातारपण. जरठ म्हणजे वृद्ध पुरुष. जरडी म्हणजे वृद्ध महिला. अवस्था फारच खिळखिळी झाली असेल तर तिला 'जराजर्जर' असा शब्द वापरला जातो. मराठीत 'जिरणे' 'जिरवणे' अशी क्रियापदे आहेत. जा...

44. आजचा शब्द 'उदर'.

इमेज
  उदर म्हणजे पोट, जठर, आतला भाग. कृष्णाचे एक नाव दामोदर असे आहे. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. अत्यंत खोडकर असल्यामुळे यशोदेने कृष्णाला दोरीने उखळाला बांधले होते. त्यामुळे ज्याच्या पोटावर दोरीचे वेढे होते त्याला 'दामोदर' असे नाव पडले. एकाच उदरातून जन्म घेणार्‍या भावंडांना 'सहोदर' म्हणतात. (एका संस्कृत हास्योक्तीमध्ये वैद्याला यमराजाचा सहोदर म्हणजे भाऊ असे गमतीने म्हटले आहे.) पोट फुगण्याच्या विकाराचे आयुर्वेदात अनेक प्रकार सांगितले आहेत. जलोदर, वातोदर, सर्पोदर, मत्स्योदर, प्लीहोदर इत्यादी. घोड्याला अमृतसहोदर असेही म्हणतात. कारण समुद्रमंथनाच्या आख्यायिकेत अमृतासोबत उच्चैःश्रवा नावाचा घोडाही निघाला होता. खादाड व्यक्तीला उदरपिशाच्च म्हणतात. पोट भरण्याच्या उद्योग हे उदरनिर्वाहाचे साधन असते. पोट हलवून नाचण्याच्या प्रकाराला उदरनृत्य म्हणतात. यात चार प्रकारे पोटाच्या हालचाली होतात. पोटावर चरबी नसलेल्या स्त्रीसाठी 'कृशोदरी' असे संबोधन प्राचीन साहित्यात आढळते.  पोटावर सरपटणार्‍या गोगलगाय वगैरेंसाठी 'उदरतलपाद' अशी संज्ञा आहे.  "उदरी शनी येणे' असा एक ...

43. आजचा शब्द 'अंतर'.

इमेज
  अंतर म्हणजे मध्ये, खाली, आतल्या भागात, मधला वेळ, मधली जागा, प्रसंग, मन. दुकानाचे 'स्थलांतर', कादंबरीचे 'भाषांतर', नेत्यांचे 'पक्षांतर', चित्रपटाचे 'मध्यांतर' या शब्दांमधून अंतर हे अव्यय अनेकदा भेटते. मात्र हा शब्द इतरांमध्ये इतका मिसळून गेला आहे की तो वेगळा शोधताना दोन शब्दांत थोडे 'अंतर' ठेवावे लागते. इकडून तिकडे जाणे म्हणजे 'अंतर'. (इंग्रजीत त्यासाठी 'ट्रान्स' असा उपसर्ग वापरतात. उदाहरणार्थ भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन, वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्ट इ.) एका देशातून दुसर्‍या देशात केले की देशांतर, एका वेशातून दुसर्‍या वेशात केले की वेशांतर.  एका हातातून दुसर्‍या हातात गेले की 'हस्तांतर'. याचे विध्यर्थक विशेषण 'हस्तांतरणीय'. म्हणजे एकाने दुसर्‍याला देण्याजोगे. मात्र बसच्या तिकीटावर 'अहस्तांतरणीय' असे छापतात. त्याचा अर्थ हे तिकीट दुसर्‍याला देता येणार नाही. देशातल्या देशात पाठवायचे असेल तर अंतरदेशीय पत्र असते.  गति या शब्दाचा एक अर्थ 'आश्रय' असा आहे. त्यावरून गति+अंतर = गत्यंतर असा शब्द तयार होतो. गत्यंतर...

42. आजचा शब्द 'ग्रह'.

इमेज
  ग्रह म्हणजे धरणे, घेणे, ओढणे, पकड, मिठी, समजूत. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने ओढलेले असतात ते आकाशातील ग्रह. ग्रहाच्या जवळ असेल तर उपग्रह. आ उपसर्ग लागला की आग्रह. सत्यासाठी असेल तर सत्याग्रह आणि टोकाचा असेल तर दुराग्रह असतो.  निग्रह म्हणजे आवरणे किंवा शिक्षा करणे. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलिस दलाचे घोषवाक्य आपल्याला निळ्या गाडीवर दिसते. यातील 'खल' म्हणजे दुष्ट आणि निग्रह म्हणजे आवरणे किंवा शिक्षा करणे. योगसाधना करणारे लोक इंद्रियांची भटकंती आवरून धरतात. त्याला इंद्रियनिग्रह म्हणतात.  परिग्रह म्हणजे धारण करणे. संसारी गृहस्थ अनेक वस्तूंचा परिग्रह करतो. मात्र संन्याशाला 'अपरिग्रह' साधावा लागतो.   वस्तू नीट जमा करून ठेवल्या की त्याला 'संग्रह' म्हणतात. जेथे अशा वस्तू नीट लावून ठेवतात त्याला 'संग्रहालय' असे नाव आहे. मात्र 'विग्रह' म्हणजे वेगळे करणे किंवा भांडण. ग्रहण करतो तो ग्राहक. बोलीभाषेत त्याला आपण गिर्‍हाइक म्हणतो. संग्रह करणारा संग्राहक. चटकन आग पकडणारा पदार्थ 'ज्वालाग्राही' असतो. गुप्त गोष्ट किंवा तात्पर्य जाणून घेणारा ...

उजेडाची दिशाः जय भीम!

इमेज
  कल्पना करा की... तुम्ही कुणीच नाही. तुमच्याकडे कसलेही ओळखपत्र नाही. तुमच्याकडे जमिनीचा इंचभर तुकडा नाही. तुम्हाला अर्ध्या रात्री पोलिस उचलून घेऊन जातात. मनात येईल तेव्हा कित्येक दिवस गुरासारखे मारतात. तुमचे ओरडणे ऐकणारे कुणीही नाही. माराने तुम्ही बेशुद्ध पडलात तर तुमच्या डोळ्यात तिखट टाकून तुम्हाला शुद्धीवर आणले जाते. तुमच्या छातीत बुटाच्या लाथा घातल्या जातात. तुमच्या बरगड्या तुटून हृदयात घुसतात... तुम्ही रक्त ओकून मरता. तुमचे प्रेत मेलेल्या उंदरासारखे लांब नेऊन फेकून दिले जाते... फक्त कल्पना करायला सांगितले तरी जीव जायची वेळ येते. पण केवळ आदिवासी किंवा भटक्या जातीत जन्म घेतला म्हणून आजही अनेकांची हीच 'दिनचर्या' आहे. दिग्दर्शक ज्ञानवेल यांचा 'जय भीम' हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तरी पुन्हा पहा. आपण पोलिस लाॅकपमधील एक आदिवासी आहोत, असे समजून पहा. तुम्ही त्या अघोरी छळातून कसे सुटू शकता याचा विचार करा. येथे तुमचा मेंदू बंद पडेल. तुमच्या सुटकेचा मार्ग एकच आहे. मृत्यू. तुम्ही लाॅकपमध्ये मरत असता तेव्हा खरे चोर कुठे असतात? बहुसंख्य खर्‍या चोरांनी आपल्या सोसायटीखाली 'वा...

41. आजचा शब्द 'गण'.

इमेज
  गण म्हणजे कळप, समूह, जमाव, जात, वर्ग, शंकराचे गण. गणनायक, गणाध्यक्ष, गणवल्लभ, गणेश ही नावे सेनापतीसाठी किंवा 'गणपती'साठी वापरली जातात. 'अचल' म्हणजे पर्वत हे आपल्याला माहीत आहे. शंकराचे गण जेथे राहतात त्या पर्वताला 'गणाचल' म्हणतात. गणाचल म्हणजे कैलास पर्वत. निवडणुका लागल्या की गण आणि गटांची चर्चा सुरू होते. पंचायत समिती मतदारसंघाला 'गण' असे नाव दिले आहे. राजा नसलेले आणि लोकांच्या बहुमताने चालवले जाणारे राज्य म्हणजे 'गणराज्य'. भारतात असे गणराज्य सव्वीस जानेवारी १९५० रोजी आरंभ झाले म्हणून या दिवसाला 'गणतंत्र' दिन म्हणतात. इंग्रजीत गणतंत्र म्हणजे रिपब्लिक.  गण म्हणजे लोकांचा समूह. लोकसमूह ज्या स्त्रीशी पती असल्याप्रमाणे वागतो तिला 'गणिका' असे नाव आहे. जेथे समूहाने जेवण केले जाते त्या खानावळीला 'गणभोजनगृह' म्हणता येईल.  गणना करणे म्हणजे मोजणे, विचारात घेणे. जो मनुष्य ग्रहतार्‍यांची स्थाने मोजून भविष्य सांगू पाहतो त्याला 'गणक' म्हणतात. गणक म्हणजे ज्योतिषी. त्याची पत्नी गणकी. मात्र 'गणकयंत्र' म्हणजे कॅल्क्युलेटर...

40. आजचा शब्द 'आवली'.

इमेज
  आवली म्हणजे रांग, ओळ किंवा माळ. आवलीसोबत येणारे सर्वात जास्त ओळखीचे शब्द म्हणजे दीपावली आणि रंगावली. दिव्यांची रांग म्हणजे दीपावली हे आता सर्वांनाच माहीत आहे. 'रंगावली'चे मराठीत रांगोळी झाले. (आणि सर्वनाश होतो तेव्हा 'राखरांगोळी' होते.) गाण्यातील पदांची रचना म्हणजे पदावली. किंवा बीजगणितातील राशी आणि बेरीज, वजाबाकी वगैरे चिन्हांची रांगसुद्धा 'पदावली' असते.  मुंड म्हणजे डोके. मुंडावली म्हणजे डोक्याला लग्नात बांधतात ती सुशोभित माळ. मराठीत तिला मुंडावळी, मंडोळी वगैरे म्हणतात.  बारामतीचे पंडित कवी मोरेश्वर पराडकर अर्थात मोरोपंत यांच्या एका काव्यसंग्रहाचे नाव 'केकावली' आणि दुसरा 'संशयरत्नावली' आहे. काळे ढग पाहून पावसासाठी मोर जो टाहो फोडतो त्याला 'केका' म्हणतात आणि कवीचे नाव मोरोपंत. त्यामुळे 'केकावली' हे नाव सार्थ ठरते. रत्नावली म्हणजे रत्नांची माळ. (संत तुलसीदासांच्या पत्नीचे नाव रत्नावली होते. सातव्या शतकातील हर्ष नावाच्या राजाने 'रत्नावली' नावाचे मोठे मनोरंजक नाटक लिहिले आहे. त्यातील नायिका रत्नावली श्रीलंकेची राजकुमारी अस...

ह्यांना झालंय तरी काय?

इमेज
  मन सुद्ध तुझं। भाग ५ मागील रविवारचा भाग आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते सतत दोन वाक्ये बोलत. "काही खरे नाही" आणि "अवघड आहे". त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर या दोन वाक्यांचा उतारा ठरलेला असे. मग हळूहळू या दोन वाक्यांची लागण त्यांच्या आसपास झाली आणि ते घर त्यांनी नैराश्याच्या दरीत ढकलले. कुठल्याही नवीन माणसाला भेटणे किंवा आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता त्यांनी गमावली होती.  हा त्यांचा स्वभाव नव्हता. मनाचा आजार होता. माणसाचा स्वभाव आणि मनाला झालेला आजार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे एकदा स्पष्ट कळले की, आजारावर वेगळा उपाय करता येतो. (स्वभावालाही औषध असते, पण ते घेण्याची इच्छा रुग्णातही असावी लागते.) काही लोकांना सतत काही ना काही चिंता करण्याची सवय असते. टेन्शनचे एक कारण संपले की ते दुसरे कारण शोधून काढतात.  अतिकाळजी करणे, सतत नशीबाला दोष देणे, निराशेचा सूर लावणे ही सगळी लक्षणे घेऊन 'शहाणे' नावाचे एक गृहस्थ मानसोपचारतज्ज्ञाकडे येतात. एबीपी माझा वाहिनीवरील 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा हा पाचवा भाग.  हे शहाणे सतत बायकोच्या तक्रारी करतात. त्य...

महाजनांचा मार्ग

इमेज
  औरंगाबादला एका लग्नाला गेलो होतो. रात्रीची वेळ होती. नवरदेवाला घोड्यावरून मिरवणे सुरू होते. समोर बँड आणि फटाके दोन्हींचा दणदणाट सुरू होता. तेवढ्यात एक ठिणगी उडाली आणि घोड्याला लागली. घोड्याने समोरचे दोन्ही पाय वर करून नवरदेवाला जागीच उताणे पाडले आणि घोडा उधळला. पुढे घोड्याने दोन रिक्षांना धडका दिल्या आणि चेतक चौकात एका मोठ्या वाहनाला धडकून तो घोडा मेला.  इकडे लहानशा करवलीसह नवरदेवाला उचलून दवाखान्यात नेले. सगळे वर्‍हाडी त्यांच्यामागे धावले. तासाभराने मलमपट्ट्यांवर मुंडावळी लावून नवरदेव आला आणि लग्न एकदाचे लागले. जर त्या दिवशी घोड्यासोबत नवरदेवही फरफटत गेला असता तर नवरी लग्नाआधीच विधवा झाली असती. 'अपशकुनी' असे म्हणून तिचीही आयुष्यभर फरफट झाली असती. हिंगोलीत एका बाळानेही नुकताच आपला एक डोळा फटाक्यामुळे गमावला आहे. दरवर्षी फटाक्यांमुळे अनेक लोक विनाकारण जीव गमावतात.  दिवाळी हा जर प्रकाशाचा उत्सव असेल तर त्यात फटाक्यासारख्या बेसूर आणि भेसूर वस्तूचे काय काम? लग्न आणि निवडणुकीतील विजय हे जर आनंदाचे प्रसंग असतील तर त्यात फटाक्याच्या लडींची बेताल तडतड कशाला? आनंदच साजरा करायचा ...

39. आजचा शब्द 'दीप'.

इमेज
दीप् या धातूचे अर्थ प्रकाशणे, पेटणे, वाढणे, तळपणे असे आहेत. दीप म्हणजे दिवा. त्याचा उजेड प्रखर असेल तर प्रदीप. सौम्य प्रकाश असेल तर संदीप. देखणा दिवा असेल तर सुदीप. हे सर्व आपल्याला माहीत असलेले शब्द आहेत. आज काही अपरिचित शब्दांची ओळख करून घेऊ.  दीपकूपी म्हणजे दिव्याची वात. काजळ किंवा समईला दीपध्वज म्हणतात. दीपकिट्ट म्हणजे काजळी. दिव्यावर झडप घालणार्‍या पतंगाला 'दीपशत्रू' असे नाव आहे. दीपक म्हणजे दिवा किंवा केशर आणि दीपिका म्हणजे दिवटी, मशाल किंवा चांदणे. पचनशक्ती कमी झाली असेल तर जठरातील अग्नी वाढवण्यासाठी दिले जाणारे औषध 'अग्निप्रदीपक' असते. (काळे मीठ, जीरे, आले, तूप आदींमुळे जठराग्नी प्रदीप्त होतो.)  जे दृश्य पाहून भावना उचंबळून येतात ते दृश्य 'उद्दीपित' करणारे असते. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य 'नेत्रोद्दीपक' असते. दीप् चा भूतकाळ दीप्त आणि त्याचे स्त्रीलिंगी रूप दीप्ती. दीप्त म्हणजे पेटलेले, तेजस्वी, शोभा, कांती. मांजराचे डोळे अंधारात चमकतात म्हणून त्याला 'दीप्तलोचन', 'दीप्ताक्ष' अशी नावे आहेत. तेजस्वी पिंगट रंग असल्यामुळे सिंहाला ...

38. आजचा शब्द 'वेद'.

इमेज
वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, जाणीव, जाणणे.  त्यावरून 'वेदना' या शब्दाचा अर्थही ज्ञान किंवा पीडा असा होतो. डोके दुखत असेल तरच आपल्याला 'डोके' असल्याची जाणीव होते. (इतर वेळी फारसा संबंध नसतो.) जेथे वेदना होतात तोच भाग आपल्याला जास्त जाणवतो. सम् उपसर्ग लागला की 'संवेदना' होते. संवेदना म्हणजे चेतना, भावना. इतरांच्या वेदना पाहून संवेदनशील मन भावुक होते.  आवेदन आणि निवेदन या शब्दांतही 'वेद' आहेच. आवेदन म्हणजे अर्ज. निवेदन म्हणजे जाहीरपणे सांगणे, अर्पण करणे. त्यावरून 'निवेद्य' म्हणजे अर्पण करण्याजोगा पदार्थ. त्याचे नामरूप आहे 'नैवेद्य'. (याचे बोलीभाषेतील रूप 'निवद'. काटकुळ्या माणसाला 'मरीआईचा निवद' म्हणतात. ) विद् हा धातू या सर्व शब्दांमध्ये समान आहे. विद् म्हणजे ज्ञान. ज्याच्याकडे विद् आहे तो विद्वान. जी ज्ञान देते ती विद्या. जो विद्येची इच्छा करतो तो विद्यार्थी. जो खूप शिकला आहे तो 'सुविद्य'. वैद्य या नामातही विद् हाच धातू आहे. वैद्य म्हणजे विद्वान मनुष्य किंवा डाॅक्टर.  'वेदि' म्हणजे यज्ञकुंड किंवा वेद जाणणारा पं...

आपण माणूस आहोत की कुत्रे?

इमेज
मनाचा स्वभाव असा आहे की त्याला कुठेच करमत नाही. ते माणसाला जराही शांतता मिळू देत नाही. आयुष्यभर धावाधाव करून, विविध सुखदुःखे भोगूनही हाती काहीच लागले नाही, असे जेव्हा वाटते तेव्हा माणूस अध्यात्माकडे वळतो. मग धार्मिक ग्रंथ त्याला मनाचा स्वभाव सांगू लागतात.  ब्रह्मबिंदू उपनिषद सांगते की, मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।  बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥ मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. जास्तीत जास्त सुखे ओरबाडणारे मन माणसाला बंधनात पाडते. मात्र कितीही सुखे भोगली तरी तृप्ती होत नाही, असे ज्याच्या लक्षात येते तेच मन माणसाला मुक्तीकडे घेऊन जाते.  आयुष्य एकदाच मिळते म्हणून जितके खाता येईल तितके खाऊन घ्या. व्यसने करून घ्या. स्वैराचार करा. असे तत्त्वज्ञान पाजळणारे लोक या जगात आहेत.  रोमचा एक राजा तर जेवण झाले की उलटीचे औषध घेत असे आणि पुन्हा वेगवेगळे पदार्थ खात असे.  आजचा माणूसही तसाच वागतो. त्याला कळत असते की मैदा, साखर, केकसारखे पदार्थ घातक आहेत. पण तरी तो स्वतःला आवरू शकत नाही. खाताना थोडा वेळ सुख मिळते. पण नंतर अनेक गोळ्या, औषधे म...

37. आजचा शब्द 'दिक्'.

इमेज
  दिक् म्हणजे दिशा. किंवा जागेचा असा विस्तार ज्यात वस्तू असतात किंवा घटना घडतात. दहा दिशांचे तीन आयाम आहेत. आयाम म्हणजे इंग्रजीत डायमेंशन. रुंदी, उंची आणि खोली. सिनेमा पाहताना जर चित्राची फक्त रुंदी आणि उंची दिसत असेल तर तो 'टूडी' सिनेमा असतो. मात्र चित्राची खोलीही दिसत असेल तर हे तिन्ही आयाम दाखवणारा सिनेमा 'थ्रीडी' असतो. जो माणूस दिशा दाखवतो त्याला दिक् + दर्शक म्हणजेच दिग्दर्शक म्हणतात. (या शब्दात संधीनियमाने क् चे रूपांतर ग् मध्ये होते.)  दाही दिशांची राज्ये ज्याने जिंकून घेतली त्याने 'दिग्विजय' मिळवलेला असतो. अंबर म्हणजे वस्त्र. दिशा हेच ज्याचे वस्त्र असते तो 'दिगंबर' असतो. दिक्काल म्हणजे अवकाश आणि काळ. रुंदी, उंची, खोली यासोबतच काळ हा चौथा आयामही लक्षात घेतला पाहिजे असे आइनस्टाइनचे म्हणणे होते. या चौथ्या आयामाला दिक्काल म्हणजे 'स्पेसटाइम' असे नाव त्याने दिले. आठ दिशांच्या आठ रक्षक हत्तींना 'दिग्गज' म्हटलेले आहे. दिगंतर म्हणजे परदेश, अंतरिक्ष.  पक्षी जाय दिगंतरा  बाळकांसि आणी चारा।  संत जनाबाईच्या काव्यात 'दिगंतर' हा शब्द आला...

36. आजचा शब्द 'कर्ष'.

इमेज
  कर्ष म्हणजे ओढणे, नांगरणे, फाडणे, नेणे. आपले मन धाव घेते तिकडे काही तरी 'आकर्षण' असते. परंतु तिरस्कार असेल तर 'विकर्षण' किंवा 'प्रतिकर्षण' असते. चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना दूर लोटतात. कारण त्यांच्यात 'प्रतिकर्षण' असते. नांगर ओढून व्यवस्थित नांगरणी करणे म्हणजे 'संकर्षण'. गर्व, घमेंड, अहंकार हेसुद्धा संकर्षणचे अन्य अर्थ आहेत. 'संकर्षण' हा वैष्णवांचा एक संप्रदाय आहे आणि कृष्णाचा मोठा भाऊ बलराम याचेही एक नाव आहे. एखाद्या संस्थेला डबघाईतून वर ओढणे म्हणजे 'उत्कर्ष'. भरपूर चर्चा केल्यानंतर त्यातून बाहेर काढला जातो तो 'निष्कर्ष' असतो. जी गोष्ट जास्त लक्षात येते ती 'प्रकर्षाने' जाणवते, असे आपण म्हणतो. जमिनीतील पाणी झाडाच्या शेंड्यापर्यंत जाते. या भौतिक घटनेला 'केशाकर्षण' असे नाव आहे. पाणी वर पोचवणार्‍या मुळांच्या नलिका केसांइतक्या सूक्ष्म असतात. त्यामुळे पाणी वर चढत जाते. भौतिकशास्त्रात याला 'सरफेस टेन्शन' म्हणतात. सोने, चांदी मोजण्याच्या एका मापालाही 'कर्ष' म्हणतात. ओढणे, नांगरणे यामागे 'कृ...