78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

ह्यांना झालंय तरी काय?

 


मन सुद्ध तुझं। भाग ५ मागील रविवारचा भाग

आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते सतत दोन वाक्ये बोलत. "काही खरे नाही" आणि "अवघड आहे". त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर या दोन वाक्यांचा उतारा ठरलेला असे. मग हळूहळू या दोन वाक्यांची लागण त्यांच्या आसपास झाली आणि ते घर त्यांनी नैराश्याच्या दरीत ढकलले. कुठल्याही नवीन माणसाला भेटणे किंवा आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता त्यांनी गमावली होती. 

हा त्यांचा स्वभाव नव्हता. मनाचा आजार होता.

माणसाचा स्वभाव आणि मनाला झालेला आजार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे एकदा स्पष्ट कळले की, आजारावर वेगळा उपाय करता येतो. (स्वभावालाही औषध असते, पण ते घेण्याची इच्छा रुग्णातही असावी लागते.)

काही लोकांना सतत काही ना काही चिंता करण्याची सवय असते. टेन्शनचे एक कारण संपले की ते दुसरे कारण शोधून काढतात. 

अतिकाळजी करणे, सतत नशीबाला दोष देणे, निराशेचा सूर लावणे ही सगळी लक्षणे घेऊन 'शहाणे' नावाचे एक गृहस्थ मानसोपचारतज्ज्ञाकडे येतात. एबीपी माझा वाहिनीवरील 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा हा पाचवा भाग. 

हे शहाणे सतत बायकोच्या तक्रारी करतात. त्यांच्या लहान मुलीला झटके येतात म्हणून ते जेवढी काळजी करतात तेवढी काळजी बायकोच्या चेहर्‍यावर दिसत नाही असे म्हणतात. मात्र त्यांच्या बायकोचे म्हणणे असते की, "शहाणे सतत लोळत असतात. उत्साह नसतो. उन्हातच जाऊ नको, पावसातच जाऊ नको, अशा सतत सूचना करतात."

या सर्व निराश वातावरणाला कंटाळून श्रीमती शहाणे एका शाळेत नोकरी धरतात. त्यात त्यांचा काही वेळ आनंदात जातो खरा, पण घरी असलेल्या शहाणेंचा दुर्मुखलेला चेहरा आठवला की त्यांनाही अपराधी वाटते.

त्या वैतागून डाॅक्टरांना विचारतात की, "ह्यांना झालंय तरी काय?" त्यावर डाॅक्टर सांगतात की, हा क्राॅनिक डायस्थेमिया नावाचा आजार आहे. आकाशात मळभ दाटून येते, पण पाऊस थोडाच पडतो आणि अंधार तसाच साचून राहतो तसा हा आजार आहे. हा स्वभाव नाही. या आजारावर उपचार करता येतात.

काही दिवसांनी शहाणेंची मुलगी बरी होते. मग शहाणे टेन्शनचे नवे कारण शोधून काढतात. त्यांच्या बायकोचे एक छोटेसे ऑपरेशन ठरते. तेव्हा संमतीपत्रावर सही करायची त्यांना भीती वाटू लागते. ऑपरेशन सुरू असताना बाहेर बसून राहण्याचेही दडपण येते, असे ते सांगतात.

शेवटी डाॅक्टर शहाणेंना खडसावतात की, या आजाराचा फार आनंद लुटताय का? सगळ्या घराने तुमच्या भोवती फिरावे यात तुम्हाला मजा वाटत असेल तर ते थांबवा आणि नियमित उपचार करून घ्या.

खिडकीतून बाहेर बघत सुखाची प्रतीक्षा करत असाल तर जरा आत वळून पहा. ते सुख तुम्हाला घरातच सापडेल.

शहाणे खरोखर शहाण्यासारखे सर्व मान्य करतात आणि हा भाग येथे संपतो.

लाला मौजी राम नावाचा शायरही म्हणालाच आहे की,

दिल के आइने में है तस्वीरे यार।

जब जरा गर्दन झुका ली और देख ली।।

- विनोद जैतमहाल

9823028332


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.