पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

57. आजचा शब्द 'अरि'

इमेज
  अरि म्हणजे शत्रु हे आता जवळपास सर्वांनाच माहीत आहे. तरी हा शब्द या लेखमालिकेत असला पाहिजे.  अरिजित, अरिंदम म्हणजे शत्रूला जिंकणारा. अरिसूदन, अरिमर्दन म्हणजे शत्रूचा नाश करणारा, अरिभद्र म्हणजे मोठा शत्रू. मुर नावाच्या दैत्याचा शत्रू म्हणजे मुरारि. हे कृष्णाचे एक नाव आहे. शंकराचा अवतार असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे एक नाव मल्हारि मार्तंड असेही आहे. खंडोबाने मल्लासुराचा संहार केला म्हणून मल्लारि किंवा मल्हारि असे नाव पडले असावे.  शत्रूचे दमन करणार्‍यास अरिकर्षण म्हणतात. चुकीच्या निर्णयाने स्वतःचा घात करून शत्रूला आनंद देणार्‍या व्यक्तीला 'अरिनंदन' किंवा 'शत्रुनंदन' असे नाव आहे.  (नंदन म्हणजे आनंद देणारा किंवा पुत्र. आनंद देणार्‍या वनाला 'नंदनवन' म्हणतात.) काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहा शत्रूंची ज्याने हत्या केली त्याला 'अरिहंत' म्हणतात. अरिहंतांनाच इतरांना उपदेश करण्याचा अधिकार असतो. अरिकुल म्हणजे शत्रूंचा जमाव. शत्रूविषयी विचार करून आपल्या देशाचे धोरण ठरवण्यास अरिचिंतन म्हणतात. अरिचिंतन म्हणजे परराष्ट्रीय राजकारण. त्रिपुरासुराचा शत्रू म्हणून शंकरा...

12. ॲनिमा ॲनिमस. मन सुद्ध तुझं। भाग १२ (पूर्वार्ध)

इमेज
  एखादी व्यक्ती भित्री भागुबाई आहे, एखादा पुरुष बायल्या आहे किंवा एखादी बाई ढालगज आहे, असे शिक्के आपल्याकडे तयार असतात.  लोक जसे आहेत तसे न स्वीकारता त्यांना बदलण्यात किंवा त्यांच्या वागण्याबद्दल त्रास करून घेण्यात आपला किती वेळ वाया जातो? जुन्या काळात 'स्वतंत्र पार्टी' नावाचा एक पक्ष होता. या पक्षाचे संस्थापक पिलू मोदी एकदा म्हणाले होते की, "मंत्रिमंडळातील एकमेव 'पुरुष' म्हणजे इंदिरा गांधी आहेत." 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा बारावा भाग पाहताना पिलू मोदींच्या या वाक्याची आठवण झाली. ही मालिका सध्या एबीपी माझा वाहिनीवर दर रविवारी प्रसारित होत आहे. मनोविकार तज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडेंच्या क्लिनिकमध्ये एक दिवस त्यांचा काॅलेजमधला मित्र शशांक भाले येतो. खूप वर्षांनी भेट झाल्यामुळे डाॅक्टर उत्साहात त्याच्याशी बोलतात. पण त्या मित्राचा संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा असतो. शशांक भाले हा आधीपासूनच मैदानी खेळापासून दूर राहणारा आणि कलाकुसर, नक्षीकाम वगैरेमध्ये रमणारा असतो. त्यामुळे त्याला काॅलेजमध्येही सतत चिडवले जात असते. मग शशांक खगोलशास्त्रात मन गुंतवतो. बदमाश स...

56. आजचा शब्द 'मान्'.

इमेज
  आधीच्या भागात आपण वान् हा प्रत्यय व त्याला जोडून येणारे शब्द पाहिले होते. आजचा मान् हा सुद्धा एक ओळखीचा प्रत्यय आहे. याचा उपयोगही मालकी किंवा स्वामित्व दाखवण्यासाठी केला जातो. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धिमान्. ज्याच्याकडे शक्ती आहे तो शक्तीमान्.   श्री म्हणजे संपत्ती, शोभा, बुद्धी, लक्ष्मी, वैभव. हे सर्व ज्याच्याकडे आहे त्यालाच आपण 'श्रीमान्' म्हणतो. भिकार्‍याकडे कितीही पैसे असले तरी त्याला आपण श्रीमान् म्हणत नाही. हनु म्हणजे हनुवटी किंवा जबडा. ज्याची हनुवटी मोठी आहे  तो हनुमान्. ब्रह्मांड पुराणात मतिमान्, श्रुतिमान्, केतुमान्, गतिमान्, धृतिमान् अशी हनुमानाच्या भावांची नावे दिलेली आहेत. (मति म्हणजे बुद्धी, श्रुती म्हणजे कान किंवा वेद, केतु म्हणजे चमक किंवा ध्वज आणि धृती म्हणजे स्थैर्य, संतोष.) जो दीर्घायुषी आहे तो आयुष्मान्. ज्याची कीर्ती चहूकडे पसरलेली आहे तो कीर्तिमान्. (मुळात हा मत् प्रत्यय आहे.) 'मंत' हा सुद्धा मालकी दाखवणारा पुल्लिंगी प्रत्यय आहे. त्यावरून बुद्धिमंत, शक्तिमंत, श्रीमंत, हनुमंत अशी विशेषणे बनतात. मालकी दाखवणारा स्त्रीलिंगी प्रत्यय आहे 'मती...

11. शंभर पायांची गोम. मन सुद्ध तुझं। भाग ११.

इमेज
  रिश्ता, प्यार, ख्याल, दीदार और माफ़ी हैं। इक 'शक' इनकी मौत के लिए काफ़ी है।। संशय येणे हे जागरुकतेचे लक्षण असले तरी सतत संशय घेणे हा एक मानसिक आजारच आहे. (संशयाचा फायदा फक्त एका ठिकाणी मिळतो. तो म्हणजे आरोपीला न्यायालयात.) संशयाने माणसाची नजर गढूळ होते. संशयी व्यक्तीसोबत जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकवासच. त्यात पुन्हा 'विवाहबाह्य संबंध' म्हणजे लफड्याचा संशय असेल तर त्याला एक वेगळीच धार चढते.  अशाच एका संशयी बायकोला घेऊन सुजय सावंत नावाचा एक मेकॅनिक मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांच्याकडे येतो आणि 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा अकरावा भाग सुरू होतो. ही मालिका सध्या एबीपी माझा वाहिनीवर दर रविवारी प्रसारित होत आहे. सुजयची पत्नी सुरेखा डाॅक्टरांच्या वेटिंग रूममध्ये बसलेली असतानाच तिची दातखिळ बसते. डाॅक्टर आणि नर्स तिला धरून केबिनमध्ये नेतात. बीपी तपासतात. तोवर ती भानावर येते.  सुरेखा डाॅक्टरांना सांगते की, "आम्हाला एक छोटी मुलगी आहे. माझा नवरा वाॅटर प्युरिफायर दुरुस्तीचे काम करतो. तसा खूप चांगला आहे. व्यसन करत नाही वगैरे. पण त्याचं समोर राहणार्‍या एका बाईसोबत लफडं आ...

55. आजचा शब्द 'वान्'.

इमेज
आज एक अतिशय ओळखीचा प्रत्यय आपण पाहणार आहोत. प्रत्यय शब्दांच्या शेवटी लागलेले असतात. वान् हा एक स्वामित्व किंवा मालकी दाखवणारा प्रत्यय आहे. ज्या पुरुषाकडे गुणांची मालकी आहेत तो गुणवान्. ज्याच्याकडे धन आहे तो धनवान्. याच प्रकारे रूपवान्, भाग्यवान्, दयावान्, बलवान्, प्रतिभावान्, शीलवान्, क्रियावान्, क्षमावान्, चरित्रवान्, विचारवान् अशा असंख्य विशेषणांमध्ये वान् हा प्रत्यय लागलेला दिसतो. (हा मुळात 'वत्' असा प्रत्यय आहे.)  विद् म्हणजे ज्ञान ज्याच्याकडे आहे तो विद्वान. भग म्हणजे सुदैव, उत्कर्ष, कीर्ती, भरभराट, यश, सौंदर्य, मोक्ष. हे सगळे ज्याच्याकडे आहे तो 'भगवान.' (भगवा या शब्दाशी 'भगवान्'चा संबंध नाही.) 'एकच प्याला' या नाटकात 'कशी या त्यजु पदाला, मम 'सुभग' शुभ पदाला।' असे पद आहे. यात 'सुभग' असा शब्द येतो. सुभग म्हणजे भाग्यवान्, सुंदर, प्रिय, मधुर. हिम म्हणजे बर्फ. त्यामुळे हिमालय पर्वताला हिमवान् असेही नाव आहे.  'वंत' असाही प्रत्यय मालकी दाखवणारा आहे. तो वरील सर्व शब्दांना लावता येईल. जसे कलावंत, गुणवंत, धनवंत, भाग्यवंत, दयावं...

10. वेदनाः रेफरल पेन. मन सुद्ध तुझं। भाग १०.

इमेज
  बहुत जुदा है औरों से मेरे दर्द की कैफियत। ज़ख्म का कोई पता नहीं और तकलीफ की इन्तेहाँ नहीं। प्रत्येक व्यक्तीला आपल्या वेदनेविषयी हेच वाटत असते की, "इतरांपेक्षा माझे दुःख वेगळे आहे. जखम तर दिसत नाही आणि वेदनेला अंत नाही." वेदना शरीरात जाणवत असली तरी तिचा उगम मनात खोलवर कुठे तरी असतो. त्यामुळेच आता पेशंट म्हणजे केवळ शरीर नाही तर त्याच्या मनाचाही विचार डाॅक्टर करत आहेत.  अशाच एका डाॅक्टरांचा फोन मानसतज्ज्ञ उदय देशपांडे यांना येतो आणि 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दहावा भाग सुरू होतो.  ही मालिका सध्या एबीपी माझा वृत्तवाहिनीवरून दर रविवारी प्रसारित होते. शोभा पटवर्धन नावाच्या पेशंटचे गर्भाशयाचे ऑपरेशन झालेले असते. कॅन्सरची गाठ काढून टाकल्यानंतरही त्यांच्या ओटीपोटात अधूनमधून आग लागल्यासारख्या वेदना होत असतात. त्यांचे डाॅक्टर शेवटी मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडेंना फोन करतात आणि शोभाताईंना त्यांच्याकडे पाठवतात. शोभाताई येतात त्या चाकाच्या खुर्चीवर बसून. नर्स त्यांना डाॅक्टरांच्या केबिनमध्ये आणून सोडते. शोभाताईंशी बोलताना डाॅक्टरांना कळते की, त्यांच्या पतीचे निधन दहा वर्षांपूर्वी...

9. हिरव्या देठाची पिवळी केळी. मन सुद्ध तुझं. भाग ९.

इमेज
  हिरव्या देठाची पिवळी केळी मन सुद्ध तुझं (भाग ९) मागील रविवारचा भाग. निदा फ़ाज़ली यांचा एक शेर आहे... धूप में निकलोघ घटाओं में नहाकर देखो। ज़िन्दगी क्या है किताबों को हटाकर देखो।। आयुष्यात पुस्तकं वाचलीच पाहिजेत, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्या भोवताली दर क्षणाला नव्यानं बदलणारं जग आणि त्याचे व्यवहार वाचता आले पाहिजेत. माणसं वाचता आली पाहिजेत. निसर्गाचे रंग, रूप, रस, गंध, स्पर्श अनुभवता आले पाहिजेत. त्यातूनच खरा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या नवव्या भागात साकेत देवस्थळी नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे. ही मालिका एबीपी माझा वाहिनीवरून दर रविवारी दाखवली जाते. साकेतला त्याचे आईवडील मानसतज्ज्ञाकडे घेऊन येतात. त्यांची तक्रार असते की साकेत दहावीत आहे आणि त्याला अभ्यास लक्षात राहत नाही. डाॅक्टर जेव्हा साकेतला एकट्याला विचारतात तेव्हा तो सांगतो की, "एक विषय वाचायला घेतला की त्याला दुसर्‍याच विषयातले काही विसरते की काय अशी भीती वाटते." लहान मुलाच्या छोट्या छोट्या हातांमध्ये दहा वस्तू कोंबल्या तर त्यातल्या आठ खाली पडणार हे निश्चित. तसे साकेतचे झाले...

54. आजचा शब्द 'अंबर'

इमेज
  अंबर म्हणजे आकाश, अंतरिक्ष, अंतराळ, वस्त्र, झगा, केशर. आकाशात रत्नाप्रमाणे चमकतो म्हणून सूर्याचे 'अंबरमणि' असे एक नाव आहे. फार उंच किंवा आकाशाला भिडलेली इमारत, पर्वत असेल तर त्याला 'अंबरलेखी' म्हणतात. देवासाठी 'अंबरौकस्' असे एक नाव आहे. औकस् म्हणजे घर आणि आकाशात ज्याचे घर आहे तो 'अंबरौकस्'.  आकाश जेथे संपल्यासारखे वाटते त्या क्षितिजाला 'अंबरान्त' म्हटले जाते. परंतु अंबर म्हणजे 'वस्त्र' असा अर्थ घेतला तर अंबरान्त म्हणजे पदराचे टोक, असाही अर्थ होतो.  पीत म्हणजे पिवळे आणि अंबर म्हणजे वस्त्र. यावरून पीतांबर म्हणजे पिवळे वस्त्र असा अर्थ आपल्याला माहीतच आहे. (पण काही जण 'पिवळा पीतांबर' असेही चुकून म्हणतात.) पिवळे वस्त्र परिधान करणारे म्हणून विष्णू, कृष्ण किंवा संन्याशांना 'पीतांबर' म्हणतात. पिवळी फुले येणार्‍या एका वनस्पतीचे नावही 'पीतांबरी' आहे. या वनस्पतीचा उपयोग त्वचा व पोटाच्या विकारांवर उपचारांसाठी होतो. नीलांबर म्हणजे निळे वस्त्र किंवा निळे वस्त्र नेसलेली व्यक्ती. हे बलराम, शनिग्रह आणि एका राक्षसाचे नाव आहे. जैन ...