78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

10. वेदनाः रेफरल पेन. मन सुद्ध तुझं। भाग १०.

 


बहुत जुदा है औरों से

मेरे दर्द की कैफियत।

ज़ख्म का कोई पता नहीं और

तकलीफ की इन्तेहाँ नहीं।


प्रत्येक व्यक्तीला आपल्या वेदनेविषयी हेच वाटत असते की, "इतरांपेक्षा माझे दुःख वेगळे आहे. जखम तर दिसत नाही आणि वेदनेला अंत नाही." वेदना शरीरात जाणवत असली तरी तिचा उगम मनात खोलवर कुठे तरी असतो. त्यामुळेच आता पेशंट म्हणजे केवळ शरीर नाही तर त्याच्या मनाचाही विचार डाॅक्टर करत आहेत. 

अशाच एका डाॅक्टरांचा फोन मानसतज्ज्ञ उदय देशपांडे यांना येतो आणि 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दहावा भाग सुरू होतो. 

ही मालिका सध्या एबीपी माझा वृत्तवाहिनीवरून दर रविवारी प्रसारित होते.

शोभा पटवर्धन नावाच्या पेशंटचे गर्भाशयाचे ऑपरेशन झालेले असते. कॅन्सरची गाठ काढून टाकल्यानंतरही त्यांच्या ओटीपोटात अधूनमधून आग लागल्यासारख्या वेदना होत असतात. त्यांचे डाॅक्टर शेवटी मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडेंना फोन करतात आणि शोभाताईंना त्यांच्याकडे पाठवतात.

शोभाताई येतात त्या चाकाच्या खुर्चीवर बसून. नर्स त्यांना डाॅक्टरांच्या केबिनमध्ये आणून सोडते. शोभाताईंशी बोलताना डाॅक्टरांना कळते की, त्यांच्या पतीचे निधन दहा वर्षांपूर्वी झालेले आहे. एकुलती एक मुलगी प्रज्ञा सिंगापूरला एका मोठ्या कंपनीत जाॅब करते. इकडे शोभाताई भारतात एकट्या आहेत. प्रज्ञा हट्टी आणि स्वतंत्र विचारांची आहे. त्यामुळे तिने भारतात येऊन आईजवळच रहावे, अशीही शोभाताईंची अपेक्षा नाही. मुलीला त्यांची काळजी वाटते. तिला बरे वाटावे म्हणून वाटेल तितके पैसे खर्च करण्याची तिची तयारी आहे.

डाॅक्टरांशी बोलताना शोभाताईंना मध्येच पोटात असह्य वेदना होतात. बोलण्यात एखादा विषय निघतो तेव्हाच वेदना बळावतात हे डाॅक्टरांच्या लक्षात येते. 

ते शेवटी शोभाताईंना विचारतात की, तुमच्या मनात जे साचले आहे ते निःसंकोच बोला. तेव्हा शोभाताई सांगतात की, त्यांची मुलगी प्रज्ञा ज्या कंपनीत कामाला असते त्या कंपनीच्या एका भागिदाराशी तिला लग्न करायचे असते. नाथाणी हे त्याचे नाव. नाथाणीने आपल्या पहिल्या बायकोचा छळ करून खून केला असा गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो कोर्टातून निर्दोष सुटलेला असतो. हे सर्व माहीत असूनही आपल्या मुलीने त्याच्याशी लग्न करावे हे शोभाताईंना पटतच नाही. त्यामुळे मुलीचा आणि तिच्या लग्नाचा विषय निघाला की, त्यांच्या पोटात वेदना होतात.

वेदनेचे हे खरे कारण पुढे आल्यानंतर डाॅक्टर सल्ला देतात की, तुमची मुलगी स्वतंत्र विचारांची आहे आणि नाथाणीने तिच्याशी लग्नानंतर गैरवर्तन केले तर ती खपवून घेणारच नाही. 

यानंतर शोभाताईंना डाॅक्टर जो मोलाचा सल्ला देतात तो त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मालिकेचा दहावा भाग यूट्यूबवर अवश्य पहा.

शेवटी शोभाताई चाकांची खुर्ची केबिनमध्येच सोडून स्वतःच्या पायाने चालत बाहेर जातात.

आपल्या पायात बळ असूनही आभासी वेदनेपायी आपण असेच व्हीलचेअरवरून फिरत असतो. परंतु या वेदनेकडे साक्षीभावाने पाहता आले तर खुर्चीची चाके थेट पायांनाच लावता येतील.

- विनोद जैतमहाल

(आजच्या दैनिक आधुनिक केसरीमधील लेख. हा मागील रविवारचा भाग आहे. ही मालिका एबीपी माझा वाहिनीवरून दर रविवारी सकाळी 10.30 व रात्री 8 वाजता प्रसारित होते. जुने भाग यू ट्यूबवर आहेत.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.