पोस्ट्स

78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

63. आजचा शब्द 'सद्'.

सद् हा एक धातू आहे. त्याचा अर्थ बसणे, बुडणे, नष्ट होणे, खचणे, निराश होणे. सदन म्हणजे घर किंवा आसन. जेथे लोकप्रतिनिधी बसतात आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करतात तेही 'सदन' असते. लोकसभा, राज्यसभा ही सदनाची उदाहरणे. येथे खासदारांनी नीट बसून कामकाज करावे असे अपेक्षित असते म्हणून सम् + सद् = 'संसद' असा शब्द वापरला जातो. (मात्र तेथे नीट बसण्याऐवजी गोंधळ घालण्यात अनेक खासदारांना रस असतो.) सदस् म्हणजे सभा आणि सभेत बसण्यासाठी जे लायक असतात ते सदस्य. एखाद्या संस्थेच्या सभेला बसण्यास पात्र असतात ते त्या संस्थेचे 'सभासद' असतात. देशाचे कामकाज पाहणारी जशी 'संसद' असते तशी शहराची व्यवस्था पाहणारी नगर 'परिषद' असते. यात परि हा उपसर्ग सद् या धातूला लावलेला आहे. मात्र सद् च्या पूर्वी इ आल्यामुळे 'षद' असे रूपांतर झाले आहे. (तसा नियम आहे.) परिषद म्हणजे चहूबाजूंनी बसलेल्या लोकांची सभा. नगर परिषदेत बसण्यास पात्र असलेल्या व्यक्तींना 'पार्षद' (किंवा नगरसेवक) म्हणतात. परिषद प्रमाणेच 'उपनिषद' या शब्दातही सद् धातू आहे. गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणज...

62. आजचा शब्द 'अशन'

इमेज
अशन म्हणजे खाणे, भक्षण करणे, चाखणे किंवा अन्न. यामागील धातू अश् आहे. या धातूचा अर्थ व्यापणे, शिरकाव करणे, मिळवणे, उपभोगणे.  अशन म्हणजे खाणे आणि प्र+अशन= प्राशन. प्राशन करणे म्हणजे चाखणे, खाणे. च्यवन ऋषींनी आवळा व इतर जडीबुटींपासून बनवलेले चाखण्यायोग्य औषध म्हणजेच प्राश. त्यालाच आपण 'च्यवनप्राश' म्हणतो. हे प्राश खाऊन च्यवन ऋषींनी वृद्धावस्थेवर मात केली होती असा उल्लेख सापडतो. अशन म्हणजे खाणे आणि 'अनशन' म्हणजे उपाशी राहणे. हिंदी भाषेत उपोषणासाठी 'अनशन' शब्द वापरला जातो. प्राश किंवा आश म्हणजे अन्न असाही अर्थ आहे. त्यावरून सकाळचे अन्न म्हणजे 'प्रातराश' म्हणजेच ब्रेक फास्ट आणि सायंकाळचे जेवण म्हणजे 'सायमाश' (डिनर) असे शब्द साहित्यात सापडतात.  अग्नीला हुताश, हुताशन किंवा आश्रयाश अशी नावे आहेत.  अग्नीच्या आश्रयाला जो जातो त्यालाच अग्नी खाऊन टाकतो. म्हणून त्याला आश्रयाश म्हणतात. ज्या ज्या वस्तूंची अग्नीत आहुती दिली जाते त्या वस्तूही तो खाऊन टाकतो म्हणून त्याला हुताश किंवा हुताशन म्हणतात. 'हुताशन'चे स्त्रीलिंगी रूप हुताशनी. फाल्गुन पौर्णिमेला होळी...

61. आजचा शब्द 'या'.

इमेज
  'या' हा एक धातू आहे. या म्हणजे वाहन, जाणे, ताब्यात ठेवणे, पोहचणे इत्यादी. 'यात' हे त्याचे भूतकाळ सांगणारे रूप आहे. 'यात' म्हणजे गेलेला. त्याविरुद्ध आयात म्हणजे आलेला (माल). निर् हा उपसर्ग लागून 'निर्यात' असा शब्द आपण देशातून बाहेर पाठवलेल्या मालासाठी वापरतो.  ज्यावर किंवा ज्यामध्ये बसून प्रवास करता येईल ते 'यान' असते. यात घोडा, गाढव, हत्ती, उंट, कार इत्यादी सर्वांचाच समावेश होतो. अवकाशात जाण्यासाठी अंतराळयान वापरले जाते. बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखांची नावे महायान आणि हीनयान अशी आहेत. वेगाने पुढे जाण्यासाठी प्र हा उपसर्ग लावून 'प्रयाण' असा शब्द वापरला जातो. मृत्यूला 'महाप्रयाण' असे म्हणतात. मृत्यूसाठी 'निर्याण' असाही एक शब्द आहे. निर्याण म्हणजे निर्वाण. उद् हा उपसर्ग लावला की 'यान'चे उद्यान होते. उद्यान म्हणजे बाहेर जाणे. बाग, उपवन असेही उद्यान शब्दाचे अर्थ आहेत. 'या' धातूपासून यात्रा असा एक शब्द प्रवासाकरिता वापरला जातो. मराठीत यात्रेकरू आणि हिंदीत यात्रीगण अशी अनेकवचने प्रवाशांसाठी आहेत. तीर्थाच्या ठ...

60. आजचा शब्द 'घोर'.

इमेज
घोर म्हणजे भयंकर, जोराचा, आवेशयुक्त, शंकर, विष. घनघोर ते बिनघोर अशी या विशेषणाची विविध रूपे आहेत. वीणेसारख्या तंतूवाद्याचा गंभीर, खर्जातल्या स्वराचा तार म्हणजे घोर. त्यामुळे गडगडाट करणारा ढगांचा आवाज म्हणजे घनघोर ध्वनि असतो. झोपेत घोरणार्‍या व्यक्तीचा आवाजही असाच खर्जातला, गंभीर असतो. त्यामुळेच 'घोरणे' हे क्रियापद आपण वापरतो. यात घ हे महाप्राण व्यंजन आणि र हे कठोर व्यंजन असल्यामुळे मानवी मुखातून नैसर्गिकरित्या हा 'घोर' उच्चार निर्माण झाला असावा. यामागे घुर् हा धातू आहे. घुर् म्हणजे घोरणे, आवाज करणे, किंकाळ्या फोडणे.  डुकराच्या नाकातून येणारा आवाजही 'घोर' असतो. म्हणून खासकरून डुकराच्या नाकपुडीसाठी 'घुरी' असा शब्द आहे. युद्धात एकमेकांवर त्वेषाने वार करताना होणारे हुंकार आणि किंकाळ्या ऐकूनच 'घनघोर युद्ध' असे म्हणतात. भयंकर अपमानाला 'घोर' अपमान म्हणतात.  घुबडाच्या दिसण्यावरून त्याला 'घोरदर्शन' असे एक नाव आहे. कासे या धातूच्या आवाजावरून त्याला 'घोरघुष्य' असे म्हणतात. कोल्हेकुई भीतीदायक वाटते. म्हणून कोल्ह्याला घोररासन किंवा घोर...

59. आजचा शब्द 'गत'.

इमेज
गत म्हणजे गेलेला, संपलेला, मरण पावलेला, आश्रय केलेला, पोचलेला.  हे गम् धातूचे भूतकाळ सांगणारे विशेषण आहे. यापूर्वी ४६व्या भागात गत विशेषणासोबत येणारे काही शब्द आपण पाहिले. बाकीचे परंतु काही महत्त्वाचे शब्द आज पाहू.  मृत व्यक्तीला आपण 'दिवंगत' म्हणतो. 'दिव' म्हणजे आकाश किंवा स्वर्ग. 'दिवंगत' म्हणजे स्वर्गात गेलेला, स्वर्गवासी. एखाद्या विषयात प्रवीण असलेल्या व्यक्तीला 'पारंगत' म्हणतात. पार म्हणजे पलीकडे. पारंगत म्हणजे त्या विषयातील सर्व ज्ञान ओलांडून पलीकडे गेलेला. एखादी संस्था वाढत जाते तेव्हा ती 'वृद्धिंगत' झाली असे आपण म्हणतो. पंचतंत्रात एका श्लोकात गतानुगतिक असा शब्द सापडतो. गतानुगतिक लोको न लोकः पारमार्थिकः। स्वतःची बुद्धी न वापरता इतरांचे आंधळेपणाने अनुकरण करणारे लोक 'गतानुगतिक' असतात. सुगत आणि तथागत ही भगवान बुद्धांची नावे आहेत. सुगत म्हणजे योग्यप्रकारे मोक्ष प्राप्त झालेले. तथागत म्हणजे (पूर्वीच्या बुद्धांप्रमाणे) त्याच मार्गावरून तसेच क्रमण केलेले. गतसत्त्व, गतप्राण म्हणजे मृत होणे. गतवयस्, गतायुष म्हणजे आयुष्य संपत आलेली फार वृद्ध...

13. ॲनिमा-ॲनिमस (उत्तरार्ध) मन सुद्ध तुझं भाग १३.

इमेज
  'मन सुद्ध तुझं' या मालिकेत बाराव्या भागाच्या पूर्वार्धात आपण पाहिले की, मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांचा मित्र शशांक भाले स्वतःचा घटस्फोट टळावा म्हणून डाॅक्टरांकडे सल्ला घेण्यासाठी येतो.  शशांक हा सौम्यहृदयी गृहस्थ आणि नीला ही त्याची हिंमतवान पत्नी अशी ही जोडी असते. शशांकच्या वडिलांनी आयुष्यभर त्याच्याशी दुजाभाव केला आणि घराच्या वाटणीतही अन्याय केला. तरीही तो घरच्यांशी किंवा कुणाशीही कधीच भांडत नाही हे पाहून टाळके सटकलेली नीला माहेरी निघून जाते. तिला घटस्फोट हवा असतो.  त्यांची मुलगी साजिरी अकरावीला तर मोठा मुलगा विराज काॅलेजला असतो. मुलगी बापाकडे तर मुलगा होस्टेलमध्ये. मागील भागात शशांक व नीलाशी डाॅक्टर बोलतात. आता त्यांना मुलांशी बोलायचे असते. या मालिकेचे तेरा भाग एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरून प्रसारित झाले आहेत. तर या तेराव्या भागात डाॅ. उदय देशपांडे मुलांशी बोलतात. साजिरी आणि विराजशी बोलताना डाॅक्टरांच्या लक्षात येते की, दोन्ही मुले आपल्या आई-वडिलांवर सारखेच प्रेम करतात.  आई आणि बाबामधील कोणकोणते गुण आवडतात याची एक यादी साजिरीने बनवलेली असते. ती यादी चुकून शशा...