78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

60. आजचा शब्द 'घोर'.



घोर म्हणजे भयंकर, जोराचा, आवेशयुक्त, शंकर, विष.

घनघोर ते बिनघोर अशी या विशेषणाची विविध रूपे आहेत.

वीणेसारख्या तंतूवाद्याचा गंभीर, खर्जातल्या स्वराचा तार म्हणजे घोर. त्यामुळे गडगडाट करणारा ढगांचा आवाज म्हणजे घनघोर ध्वनि असतो. झोपेत घोरणार्‍या व्यक्तीचा आवाजही असाच खर्जातला, गंभीर असतो. त्यामुळेच 'घोरणे' हे क्रियापद आपण वापरतो. यात घ हे महाप्राण व्यंजन आणि र हे कठोर व्यंजन असल्यामुळे मानवी मुखातून नैसर्गिकरित्या हा 'घोर' उच्चार निर्माण झाला असावा. यामागे घुर् हा धातू आहे. घुर् म्हणजे घोरणे, आवाज करणे, किंकाळ्या फोडणे. 

डुकराच्या नाकातून येणारा आवाजही 'घोर' असतो. म्हणून खासकरून डुकराच्या नाकपुडीसाठी 'घुरी' असा शब्द आहे.

युद्धात एकमेकांवर त्वेषाने वार करताना होणारे हुंकार आणि किंकाळ्या ऐकूनच 'घनघोर युद्ध' असे म्हणतात. भयंकर अपमानाला 'घोर' अपमान म्हणतात. 

घुबडाच्या दिसण्यावरून त्याला 'घोरदर्शन' असे एक नाव आहे. कासे या धातूच्या आवाजावरून त्याला 'घोरघुष्य' असे म्हणतात. कोल्हेकुई भीतीदायक वाटते. म्हणून कोल्ह्याला घोररासन किंवा घोरवाशन अशी नावे आहेत. रासन किंवा वाशन म्हणजे आवाज.

शंकराच्या एका चेहर्‍याचे नाव 'अघोर' आहे. घोर शब्दाचा एक अर्थ 'घनदाट' असा आहे. हे अंधाराचे प्रतीक आहे. त्यामुळे 'अघोर' म्हणजे जेथे अंधार नाही. केवळ प्रकाश आहे. अघोरी म्हणजे अंधार हटवणारा. अंधाराचा अर्थ 'भय' असाही होऊ शकतो. म्हणून अघोरी म्हणजे भयापासून मुक्त करणारा. अघोरपंथी साधकांची साधना सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होण्यासाठीच असते. 

मराठीत घोर म्हणजे चिंता. यात भविष्यातील अंधार आणि भय दोन्हींचाही समावेश असतो. (मात्र ज्याला काहीच चिंता नसते तो बिनघोर असतो.)

घोर या विशेषणाची अशी अनेक भयंकर रूपे अधूनमधून आपल्या भेटीला येतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.