78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

13. ॲनिमा-ॲनिमस (उत्तरार्ध) मन सुद्ध तुझं भाग १३.

 


'मन सुद्ध तुझं' या मालिकेत बाराव्या भागाच्या पूर्वार्धात आपण पाहिले की, मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांचा मित्र शशांक भाले स्वतःचा घटस्फोट टळावा म्हणून डाॅक्टरांकडे सल्ला घेण्यासाठी येतो. 

शशांक हा सौम्यहृदयी गृहस्थ आणि नीला ही त्याची हिंमतवान पत्नी अशी ही जोडी असते. शशांकच्या वडिलांनी आयुष्यभर त्याच्याशी दुजाभाव केला आणि घराच्या वाटणीतही अन्याय केला. तरीही तो घरच्यांशी किंवा कुणाशीही कधीच भांडत नाही हे पाहून टाळके सटकलेली नीला माहेरी निघून जाते. तिला घटस्फोट हवा असतो. 

त्यांची मुलगी साजिरी अकरावीला तर मोठा मुलगा विराज काॅलेजला असतो. मुलगी बापाकडे तर मुलगा होस्टेलमध्ये. मागील भागात शशांक व नीलाशी डाॅक्टर बोलतात. आता त्यांना मुलांशी बोलायचे असते.

या मालिकेचे तेरा भाग एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरून प्रसारित झाले आहेत.

तर या तेराव्या भागात डाॅ. उदय देशपांडे मुलांशी बोलतात. साजिरी आणि विराजशी बोलताना डाॅक्टरांच्या लक्षात येते की, दोन्ही मुले आपल्या आई-वडिलांवर सारखेच प्रेम करतात. 

आई आणि बाबामधील कोणकोणते गुण आवडतात याची एक यादी साजिरीने बनवलेली असते. ती यादी चुकून शशांकच्या हाती पडते तेव्हा त्यात नीलाच्या अनेक गुणांची भर घालून तो दोघांची गुणसंख्या समान करतो. हे पाहून साजिरीच्या मनातील बाबाची प्रतिमा खूपच उंचावते. त्यामुळे वेगळे राहण्याची वेळ येते तेव्हा ती बाबाची निवड करते. 

आता आई एकटी पडू नये म्हणून विराज नाईलाजाने आईची निवड करतो. परंतु तिला दुसरे लग्न करता यावे म्हणून स्वतः होस्टेलवर राहत असतो. 

पण दोघांनाही आई-बाबा एकत्रच हवे असतात, हे लक्षात आल्यानंतर डाॅक्टर पुन्हा शशांक व नीलाला बोलावून घेतात. तेव्हा शशांक म्हणतो की, "साजिरी वयात आली आहे. तिला आईची गरज आहे. माझा स्वभाव पडखाऊ आहे. मला कुणाशी भांडता येत नाही. म्हणून नीलाने साजिरीचा बाप व्हावे. मी मुलांची आई होतो. प्रत्येक ग्रहाला जशी आपल्या कक्षेची मर्यादा असते तशी प्रत्येक माणसालाही आपल्या स्वभावाची मर्यादा असते."

यावर नीला परतण्याचा निर्णय घेते. घरी जाण्यासाठी शशांकने स्कूटर आणलेली असते. शशांकला ती मागच्या सीटवर बसायला सांगते आणि स्कूटरसह घराची सूत्रे हाती घेते.

येथे हा तेरावा भाग संपतो. पण तो प्रत्यक्ष पाहतानाच त्यातली खरी उष्णता तुम्हाला जाणवेल.

शशांकमधले स्त्रीतत्त्व आणि नीलामधील पुरुषतत्त्व यांना मनोविज्ञानाच्या भाषेत 'ॲनिमा व ॲनिमस' म्हणतात. कार्ल युंग नावाच्या मनोविकार तज्ज्ञाने हे लिहून ठेवले आहे.

युंगच्या मते 'मानवी मनाचा शोध' हेच उद्याचे खरे विज्ञान आहे आणि या विज्ञानाची आपल्याला अतिशय गरज आहे. कोविडनंतरच्या काळात तर असे जाणवत आहे की, माणसाला सगळ्यात जास्त धोका जीवाणू, विषाणू, दुष्काळ किंवा रोगराईपासून नाही, तर तो स्वतःपासूनच आहे. त्यामुळे अजूनही ही मालिका आपण पाहिली नसेल तर या मालिकेचे सर्व भाग यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

मालिकेच्या तेराव्या भागात शशांक भालेच्या भूमिकेत पुष्कर श्रोत्री आणि डाॅक्टरच्या भूमिकेतील स्वप्नील जोशी या दोन दिग्गज नटांची जुगलबंदी खासच रंगते. मानसी कुलकर्णी यांनी टाॅमबाॅय नीलाचे धैर्य आणि हतबलता यांचे मिश्रण कौशल्याने सादर केले. साजिरी जोशी आणि राजस सुळे या बहीणभावांच्या बोलण्यातून घरातील ताणाचे ओझे स्पष्ट दिसत राहते. तशी तर मालिकेच्या सर्व भागांमधील सर्वच कलावंतांची कामे अतिशय चोख आहेत.

डाॅ. नंदकुमार मुलमुले यांच्या कथांसाठी प्रशांत दळवी यांचे तोलून मापून लिहिलेले आकर्षक संवाद, अवचेतन मनापर्यंत झिरपणारे दासू वैद्य यांचे शीर्षक गीत, अशोक पत्की यांचे सुखावणारे संगीत आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे काटेकोर, अनुभवी दिग्दर्शन यांच्या संयोगातून मनाचा तळ शोधणारी ही उपयुक्त मालिका साकार झाली आहे. 

तेरा भागांचा पहिला सीझन संपलाय. 

प्रेक्षक पुढील पर्वाची नक्कीच वाट पाहत आहेत.

- विनोद जैतमहाल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.