78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

11. शंभर पायांची गोम. मन सुद्ध तुझं। भाग ११.

 


रिश्ता, प्यार, ख्याल, दीदार और माफ़ी हैं।

इक 'शक' इनकी मौत के लिए काफ़ी है।।

संशय येणे हे जागरुकतेचे लक्षण असले तरी सतत संशय घेणे हा एक मानसिक आजारच आहे. (संशयाचा फायदा फक्त एका ठिकाणी मिळतो. तो म्हणजे आरोपीला न्यायालयात.)

संशयाने माणसाची नजर गढूळ होते. संशयी व्यक्तीसोबत जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकवासच. त्यात पुन्हा 'विवाहबाह्य संबंध' म्हणजे लफड्याचा संशय असेल तर त्याला एक वेगळीच धार चढते. 

अशाच एका संशयी बायकोला घेऊन सुजय सावंत नावाचा एक मेकॅनिक मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांच्याकडे येतो आणि 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा अकरावा भाग सुरू होतो. ही मालिका सध्या एबीपी माझा वाहिनीवर दर रविवारी प्रसारित होत आहे.

सुजयची पत्नी सुरेखा डाॅक्टरांच्या वेटिंग रूममध्ये बसलेली असतानाच तिची दातखिळ बसते. डाॅक्टर आणि नर्स तिला धरून केबिनमध्ये नेतात. बीपी तपासतात. तोवर ती भानावर येते. 

सुरेखा डाॅक्टरांना सांगते की, "आम्हाला एक छोटी मुलगी आहे. माझा नवरा वाॅटर प्युरिफायर दुरुस्तीचे काम करतो. तसा खूप चांगला आहे. व्यसन करत नाही वगैरे. पण त्याचं समोर राहणार्‍या एका बाईसोबत लफडं आहे. त्या बाईला मुलंबाळं आहेत. तिचा नवरा दुबईला असतो. श्रीमंत आहे. अधून मधून येतो. परत जातो आणि ही बाई इकडे रंग उधळते." 

डाॅक्टर सुरेखाला विचारतात की,"तुला असा संशय का येतो?" तर सुरेखा सांगते की,"मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की, ती बाई माझ्या नवर्‍याच्या स्कूटरवर बसून जाताना. पूर्वी नीटनेटके राहायला सांगितले तर दुर्लक्ष करायचा. पण आता उलटसुलट भांग पाडत बसतो. खिडकीत उभा राहून चहा पितो. लक्ष सगळं समोर. फोनला हात लावून हळूहळू बोलतो. कामावर गेला की माझा फोन घेत नाही. घेतला तरी तुटक बोलतो. त्यामुळे आता माझा जीव कशातच रमत नाही. सारखे तेच विचार येतात. जेवण गोड लागत नाही."  

बोलता बोलता सुरेखाच्या डोळ्यांत अश्रू येतात.

डाॅक्टर विचारतात की, दातखिळ कधीपासून बसते. तर ती सांगते की, संशय आला तेव्हापासून.

आता डाॅक्टर या प्रकरणाचा ताबा घेतात आणि तिला विचारतात की, "या प्रकरणाला दुसरी बाजू असू शकेल असे तुला वाटत नाही का? तू तुझ्या नवर्‍याची तक्रार करतानाही त्याच्याबद्दल चांगलंच बोलत होतीस. मग कदाचित तूच 'चेन्नईच्या टॅक्सीत' बसली असशील!" (चेन्नईची टॅक्सी म्हणजे काय ते सुरेखाला कळत नाही. तेव्हा डाॅक्टर तिला एक किस्सा सांगतात. ते एकदा चेन्नईला गेले असताना टॅक्सीवाला आपल्याला लुटतो की काय या संशयाने डाॅक्टर घाबरले होते. मात्र टॅक्सीवाल्याने त्यांना सुखरूप हाॅटेलवर पोचवले होते.)

शेवटी सुजय सावंतला डाॅक्टर केबिनमध्ये बोलावतात. त्याच्याशी बोलल्यानंतर या संशयामागचा उलगडा होतो आणि तिघेही मनमोकळे हसू लागतात.

हा उलगडा नेमका काय होतो ते पाहण्यासाठी मालिकेचा अकरावा भाग यू ट्यूबवर पाहू शकता.

सत्याचा आधार नसलेला संशय म्हणजे विभ्रम. संशय ही शंभर पायांची गोम आहे. ती ज्याच्या डोक्यात घुसते त्याला ठार वेडे करते. तिचे एक दोन पाय तुटल्याने काहीच होत नाही. तिला पूर्णपणे डोक्याबाहेर फेकून देणे हाच जालीम इलाज असतो. 

संशयाने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झालेली आहेत. लोकांनी एकमेकांचे खून केले आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळेच केवळ संशयावरून न्यायालय कुणालाही फाशी देत नाही. आरोपीचा जीव गेल्यानंतर संशय खोटा निघाला तर त्याचा जीव परत कसा आणणार? 

संशय घेतल्याने संशय वाढतो आणि विश्वास ठेवल्याने विश्वास वाढतो. जगण्यात आशय असेल तरच मजा आहे. संशयाने केवळ मातीच होते.

- विनोद जैतमहाल

9823028332


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.