78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

उजेडाची दिशाः जय भीम!

 

कल्पना करा की... तुम्ही कुणीच नाही. तुमच्याकडे कसलेही ओळखपत्र नाही. तुमच्याकडे जमिनीचा इंचभर तुकडा नाही. तुम्हाला अर्ध्या रात्री पोलिस उचलून घेऊन जातात. मनात येईल तेव्हा कित्येक दिवस गुरासारखे मारतात. तुमचे ओरडणे ऐकणारे कुणीही नाही. माराने तुम्ही बेशुद्ध पडलात तर तुमच्या डोळ्यात तिखट टाकून तुम्हाला शुद्धीवर आणले जाते. तुमच्या छातीत बुटाच्या लाथा घातल्या जातात. तुमच्या बरगड्या तुटून हृदयात घुसतात... तुम्ही रक्त ओकून मरता. तुमचे प्रेत मेलेल्या उंदरासारखे लांब नेऊन फेकून दिले जाते...

फक्त कल्पना करायला सांगितले तरी जीव जायची वेळ येते. पण केवळ आदिवासी किंवा भटक्या जातीत जन्म घेतला म्हणून आजही अनेकांची हीच 'दिनचर्या' आहे.

दिग्दर्शक ज्ञानवेल यांचा 'जय भीम' हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तरी पुन्हा पहा. आपण पोलिस लाॅकपमधील एक आदिवासी आहोत, असे समजून पहा. तुम्ही त्या अघोरी छळातून कसे सुटू शकता याचा विचार करा. येथे तुमचा मेंदू बंद पडेल.

तुमच्या सुटकेचा मार्ग एकच आहे. मृत्यू.

तुम्ही लाॅकपमध्ये मरत असता तेव्हा खरे चोर कुठे असतात? बहुसंख्य खर्‍या चोरांनी आपल्या सोसायटीखाली 'वाॅचमन' ठेवलेला असतो. खतरनाक कुत्रे पाळलेले असते. काळा कोटवाला वकीलही पाळलेला असतो. पोलिस त्यांच्या ताटाखालचे मांजर असतात. हे चोर बँकेत गेले की, मॅनेजर स्वतःहून त्यांना तिजोरीच्या चाव्या देतात. हे चोर मित्रांना काळी कॅश देऊन त्यांच्याकडून पांढरे चेक घेतात. त्या पैशातून परदेशी जातात. 

संघटित लूटमार करण्याच्या एकमेव उद्देशाने ते संविधानाचा कसून अभ्यास करतात. अधिकारीही होतात.

हे चोर निवडणुकीला उभे राहिले की, लोक सन्मानाने त्यांच्या जबड्यात मान देतात. हे चोर संसदेत जातात. तेथे त्यांना अटक करता येत नाही. 

हे चोर असे मुक्तपणे विहार करू शकतात. कारण ते खानदानी चोर असतात. त्यांना मानवाचे सर्व अधिकार लागू असतात.

'जय भीम' या चित्रपटातील सर्व आदिवासी उघडे असले तरी खानदानी चोर मात्र 'नागडे' केले आहेत. 

संविधानाच्या ढालीमागे लपणार्‍या कुलीन चोरांना प्रत्यक्षातही उघड्यावर आणले तरच 'जय भीम' या घोषणेला अर्थ आहे.

- विनोद जैतमहाल

9823028332


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.