78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

36. आजचा शब्द 'कर्ष'.

 


कर्ष म्हणजे ओढणे, नांगरणे, फाडणे, नेणे.

आपले मन धाव घेते तिकडे काही तरी 'आकर्षण' असते. परंतु तिरस्कार असेल तर 'विकर्षण' किंवा 'प्रतिकर्षण' असते. चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना दूर लोटतात. कारण त्यांच्यात 'प्रतिकर्षण' असते.

नांगर ओढून व्यवस्थित नांगरणी करणे म्हणजे 'संकर्षण'. गर्व, घमेंड, अहंकार हेसुद्धा संकर्षणचे अन्य अर्थ आहेत. 'संकर्षण' हा वैष्णवांचा एक संप्रदाय आहे आणि कृष्णाचा मोठा भाऊ बलराम याचेही एक नाव आहे.

एखाद्या संस्थेला डबघाईतून वर ओढणे म्हणजे 'उत्कर्ष'. भरपूर चर्चा केल्यानंतर त्यातून बाहेर काढला जातो तो 'निष्कर्ष' असतो. जी गोष्ट जास्त लक्षात येते ती 'प्रकर्षाने' जाणवते, असे आपण म्हणतो.

जमिनीतील पाणी झाडाच्या शेंड्यापर्यंत जाते. या भौतिक घटनेला 'केशाकर्षण' असे नाव आहे. पाणी वर पोचवणार्‍या मुळांच्या नलिका केसांइतक्या सूक्ष्म असतात. त्यामुळे पाणी वर चढत जाते. भौतिकशास्त्रात याला 'सरफेस टेन्शन' म्हणतात. सोने, चांदी मोजण्याच्या एका मापालाही 'कर्ष' म्हणतात.

ओढणे, नांगरणे यामागे 'कृष' हा धातू आहे. शेतकरी नांगर ओढून जमीन नांगरतो म्हणून त्याला 'कृषक', कृषीवल' असे म्हणतात आणि शेतीकामाला 'कृषी' म्हणतात. 

कर्षण म्हणजे इंग्रजीत ट्रॅक्शन. जो ओढतो तो कर्षक म्हणजेच ट्रॅक्टर. शेत नांगरण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाहनाला 'ट्रॅक्टर' म्हणतात हा योगायोग नक्कीच नाही.

कर्ष असलेले असे अनेक शब्द आपल्याला 'आकर्षित' करतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.