36. आजचा शब्द 'कर्ष'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कर्ष म्हणजे ओढणे, नांगरणे, फाडणे, नेणे.
आपले मन धाव घेते तिकडे काही तरी 'आकर्षण' असते. परंतु तिरस्कार असेल तर 'विकर्षण' किंवा 'प्रतिकर्षण' असते. चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना दूर लोटतात. कारण त्यांच्यात 'प्रतिकर्षण' असते.
नांगर ओढून व्यवस्थित नांगरणी करणे म्हणजे 'संकर्षण'. गर्व, घमेंड, अहंकार हेसुद्धा संकर्षणचे अन्य अर्थ आहेत. 'संकर्षण' हा वैष्णवांचा एक संप्रदाय आहे आणि कृष्णाचा मोठा भाऊ बलराम याचेही एक नाव आहे.
एखाद्या संस्थेला डबघाईतून वर ओढणे म्हणजे 'उत्कर्ष'. भरपूर चर्चा केल्यानंतर त्यातून बाहेर काढला जातो तो 'निष्कर्ष' असतो. जी गोष्ट जास्त लक्षात येते ती 'प्रकर्षाने' जाणवते, असे आपण म्हणतो.
जमिनीतील पाणी झाडाच्या शेंड्यापर्यंत जाते. या भौतिक घटनेला 'केशाकर्षण' असे नाव आहे. पाणी वर पोचवणार्या मुळांच्या नलिका केसांइतक्या सूक्ष्म असतात. त्यामुळे पाणी वर चढत जाते. भौतिकशास्त्रात याला 'सरफेस टेन्शन' म्हणतात. सोने, चांदी मोजण्याच्या एका मापालाही 'कर्ष' म्हणतात.
ओढणे, नांगरणे यामागे 'कृष' हा धातू आहे. शेतकरी नांगर ओढून जमीन नांगरतो म्हणून त्याला 'कृषक', कृषीवल' असे म्हणतात आणि शेतीकामाला 'कृषी' म्हणतात.
कर्षण म्हणजे इंग्रजीत ट्रॅक्शन. जो ओढतो तो कर्षक म्हणजेच ट्रॅक्टर. शेत नांगरण्यासाठी वापरल्या जाणार्या वाहनाला 'ट्रॅक्टर' म्हणतात हा योगायोग नक्कीच नाही.
कर्ष असलेले असे अनेक शब्द आपल्याला 'आकर्षित' करतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
व्वा!!! छानच
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 🙏
उत्तर द्याहटवाGreat sir 👌
उत्तर द्याहटवाThank you. 🙏
हटवाBrilliant words si thank u👌🙏
उत्तर द्याहटवाBrilliant words sir thank u 👌🙏
उत्तर द्याहटवाWelcome. 🙏
हटवा