78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

29. आजचा शब्द 'ईक्षण'

 


ईक्षण

ईक्षण म्हणजे नजर, दृष्टी, डोळा, काळजी घेणे.

रोजच्या वापरात हा शब्द इतका सहज मिसळून गेला आहे की, तो दाखवल्याशिवाय दिसत नाही.

परीक्षण, निरीक्षण, सर्वेक्षण असे अनेक शब्द ईक्षणवर आधारित आहेत. परि हा उपसर्ग लागून परीक्षा, परीक्षण हे शब्द तयार होतात. 

निर् हा उपसर्ग लागून 'निरीक्षण' आणि सर्व + ईक्षण यापासून सर्वेक्षण असे शब्द आपण वापरतो. सर्वेक्षण म्हणजे सर्वांकडे पाहणे. 

अधि हा उपसर्ग लागला की 'अधीक्षण' होतो. अधीक्षण म्हणजे वरून लक्ष ठेवणे. त्यामुळे पोलिस दलावर लक्ष ठेवणारा अधिकारी 'पोलिस अधीक्षक' असतो. 

'ईक्ष'चे स्त्रीलिंगी रूप ईक्षा. त्याला 'प्रति' हा उपसर्ग लागून 'प्रतीक्षा' (म्हणजे वाट पाहणे), अप लागला की अपेक्षा, उप लागून 'उपेक्षा' आणि सम् लागला की 'समीक्षा' अशी नावे तयार होतात. 

(मुळात ईक्ष् धातू दीर्घ असल्यामुळे परीक्षा, निरीक्षण, समीक्षा, प्रतीक्षा वगैरे शब्दांची वेलांटी नेहमी दीर्घच लिहावी. अनेक शिक्षकांनाच हे माहीत नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही माहीत नसते.)

काव्यामध्ये 'उत्प्रेक्षा' नावाचा अलंकार असतो. त्यातही 'ईक्षा' आहेच. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. 

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.