78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

28. आजचा शब्द 'दर्श'

 


दर्श

दर्श म्हणजे पाहणे, दिसणे, पुरावा, अमावास्या.

दर्शन, प्रदर्शन, निदर्शन, मार्गदर्शन असे दररोज वापरले जाणारे शब्द आपल्या अतिपरिचयाचे आहेत. 

दर्शन म्हणजे दिसणे, पाहणे यासोबतच जाणणे, समजणे, विचार, मत, असेही अर्थ आहेत. त्यावरून तत्त्वज्ञानाला 'दर्शनशास्त्र' असे म्हणतात.

(सांंख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही षड्दर्शने आणि बौद्ध, जैन ही नास्तिक दर्शने प्रसिद्ध आहेत.)

सुदर्शन म्हणजे देखणा किंवा सहज दिसणारा. वस्तू दाखवण्यासाठी पुढे मांडून ठेवल्या की ते प्रदर्शन होते. एखादी समस्या सरकारला दाखवायची असल्यास 'निदर्शने' केली जातात. 

प्रतिबिंब दाखवतो तो 'आदर्श'. आदर्श म्हणजे आरसा किंवा नमुना. एखादा सरकारी प्रकल्प मोठ्या भागात राबवण्यापूर्वी छोट्या भागात त्याची चाचणी घेतात. त्याला 'पथदर्शी प्रकल्प' म्हणतात. (इंग्रजीत तो पायलट प्रोजेक्ट असतो.) ज्या व्यक्तीला पाहून आनंद होतो तिला प्रियदर्शन किंवा प्रियदर्शिनी म्हणतात. 'प्रियदर्शिनी' हे इंदिरा गांधींचे नाव होते.

भा. रा. तांबे यांनी 'मावळत्या दिनकरा' या कवितेत सूर्याला 'समदर्शी' म्हटले आहे. सर्वांना सारख्याच दृष्टीने पाहणारा तो 'समदर्शी'. चैत्र अमावास्येला 'दर्श अमावास्या' म्हणतात.

अस्मितेचे दर्शन घडवणारे 'अस्मितादर्श' हे नियतकालिक प्रसिद्ध आहे.

पारदर्शक, सूक्ष्मदर्शक, दूरदर्शन अशा अनेक रूपांमध्ये 'दृश्' धातू असलेला 'दर्श' हा शब्द पुढे येतच राहतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.