78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

सवाल उतने नहीं हैं...

 


'मन सुद्ध तुझं' मालिकेचा मागील रविवारचा भाग

सर्व सजिवांना जिवंत राहण्यासाठी एक विशिष्ट तापमान लागते. त्यापेक्षा फार जास्त किंवा कमी तापमान झाले की जीव होरपळतो किंवा गोठून जातो.

मुलांच्या मनालाही घरातून ऊबदार वातावरण मिळाले तर त्यांचे मन खुलते, बहरते. मात्र घरातील मोठी माणसे हिंसक, व्यसनी, अतिरागीट असतील तर मुलांच्या मनावर त्याचा किती वाईट परिणाम होतो हे आपल्याला माहीतच आहे. पण हा परिणाम स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारापर्यंत जाऊ शकतो आणि हा आजार अनेक वर्षे कसा छळतो याचे वास्तव चित्रण 'मन सुद्ध तुझं' या एबीपी माझा वाहिनीवरील मालिकेच्या चौथ्या भागात येते.

स्किझोफ्रेनियाला मराठीत छिन्नमनस्कता म्हणतात.

कविता नावाच्या मुलीला तिची आई डाॅक्टरांकडे घेऊन येते. चार घरी स्वयंपाक करून जगण्यासाठी धडपडणारी निर्मला नावाची ही गरीब बाई असते. कविता बर्‍याचदा आपल्याच तंद्रीत असते. एकटीच काही तरी पुटपुटते. अंघोळ करत नाही. दिवसभर झोपून असते वगैरे तिच्या तक्रारी असतात.

पण कविताचे म्हणणे असते की, तिच्या बापाने प्रचंड संपत्ती मागे ठेवली आहे आणि त्याची मोजदाद ती मनातल्या मनात करत असते. तिची आई कावेबाज आहे आणि ती सगळी संपत्ती हडप करील असा संशय कविता व्यक्त करते. 

निर्मलाबाईंना डाॅक्टर याबद्दल विचारतात तेव्हा त्या सांगतात की, कविताचा बाप कधीचाच वारला आहे. तो दारू पिऊन घरी यायचा तेव्हा कविता अंधारात, कोपर्‍यात लपून बसायची. असाच एक दिवस तिला अंधारात विंचू चावला. तेव्हापासून तिची भीती वाढत गेली. पुटपुटणे सुरू झाले. 

छिन्नमानस या आजारात कृती, विचार आणि भावना यांचा संबंध तुटतो. आपले विचार दुसर्‍याचे वाटायला लागतात. भास होतात, भीती वाढते.

अनुवंशिकता, मेंदूतील रासायनिक बदल आणि भोवतालचे वातावरण ही तीन प्रमुख कारणे छिन्नमानस या आजाराची सांगितली जातात. आयुष्यभर नियमित औषधे घेतली तर हा आजार बळावत नाही एवढेच.

मानसिक आजार म्हणजे सरसकट 'वेड लागणे' असे नसते.  तर या आजारांचे प्रकार आणि त्यावर उपचार समजून घेतले तर किती काळ धीर धरायचा आहे हे कळते. 

कविताचे पुढे काय करायचे? या प्रश्नाचे अनेक पर्याय तिची आई सुचवते. तिचे लग्न करून द्यावे का? तिला व्यवसाय करू द्यावा का? कुठे नोकरीला लावावे का? असे अनेक पर्याय. मात्र यातील एकही गोष्ट शक्य नाही हे डाॅक्टर आणि आईलाही माहीत असते. केवळ डाॅक्टरांशी बोलल्याने बरे वाटते म्हणून ती बोलत असते. 

जेव्हा एखाद्या प्रश्नाला अनेक पर्याय पुढे येतात. तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर नसते. आयुष्याने आपल्याला कोंडीत पकडलेले असते. हा विरोधाभास समजून घेणे हाच एक पर्याय उरतो.

हेच सत्य डाॅक्टर आपल्या साहाय्यकाला एका शेरातून सांगतात...

समझ सके तो समझ जिन्दगी की उलझन को

सवाल उतने नहीं है जवाब जितने हैं।

येथे हा चौथा भाग संपतो आणि एक प्रश्नचिह्न तसेच मनात रेंगाळत राहते.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.