9. आजचा शब्द 'आशय'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शब्द काय सांगतात?
भाग ९
आशय
आशय म्हणजे स्थान, साठा, हेतु.
याला जोडून अनेक ओळखीचे तर काही अनोळखी शब्द आज पाहू.
पावसाने तुडुंब भरत असल्यामुळे 'जलाशय' हा शब्द सध्या रोजच भेटतो.
परंतु 'महाशय' मध्ये सुध्दा आशय आहेच. ज्याचे स्थान किंवा हेतु महान आहे तो महाशय.
जठराला हिंदीत आमाशय म्हणतात. आम म्हणजे अर्धवट पचलेले अन्न. जठरात अन्न अर्धवट पचवून पुढे ढकलले जाते म्हणून ते आमाशय. हे अर्धवट पचलेले अन्न पुढे पक्वाशयात येते. हा लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग असतो. येथे अन्न बर्यापैकी पचते म्हणून ते पक्वाशय.
यकृतातील पित्त साठवते ते पित्ताशय. गर्भाचे स्थान गर्भाशय. तसेच मलाशय, मूत्राशय, कफाशय असे शब्द आपल्या ओळखीचे आहेत.
याशिवाय अग्न्याशय, क्षुद्राशय, दिवाशय, पापाशय, दुष्टाशय असे अनेक अपरिचित शब्दही साहित्यात आढळतात.
'आशय' असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
© विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा