7. आजचे शब्द 'अंशु' आणि 'चंड'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शब्द काय सांगतात
भाग ७
अंशु आणि चंड
अंशु म्हणजे किरण आणि चंड म्हणजे भयंकर, तीव्र, रागीट, उष्ण. हे दोन्ही शब्द एकत्र येऊन चंडांशु असा समास होतो. चंडांशु म्हणजे सूर्य.
(चंड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप चंडा, चंडि किंवा चंडिका. म्हणजे उग्र रूप धारण केलेली स्त्री किंवा देवी.)
याच चंड ला प्र हा उपसर्ग लावून प्रचंड हा शब्द बनतो. प्रचंड म्हणजे प्रखर आणि उष्ण. मग 'प्रचंड थंड' असे म्हणणे योग्य आहे का? 'अतिशय थंड' असे म्हणता येईल.
माली म्हणजे माळ परिधान केलेला. अंशुमाली म्हणजे किरणांची माळ घालणारा सूर्य.
सुधा म्हणजे अमृत. त्यामुळे सुधांशु म्हणजे अमृतकिरणांचा वर्षाव करणारा चंद्र.
शीत म्हणजे थंड आणि शीतांशु म्हणजे शीतल किरणांचा चंद्र. हिमांशु म्हणजे बर्फासारखी थंड किरणे असलेला चंद्र आणि अंशुमान म्हणजेही चंद्रच.
अंशु आणि चंड असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
© विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा