6. आजचा शब्द 'ईश'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शब्द काय सांगतात?
भाग ६
ईश
ईश म्हणजे अधिपती, मालक, नवरा, ताब्यात ठेवणारा, समर्थ.
समासात हा शब्द इतर शब्दांशी जोडला जाऊन वेगवेगळी नावे कशी तयार होतात बघा...
रजनीश नावाचे मोठे विचारवंत होऊन गेले. रजनी म्हणजे रात्र. रजनीश म्हणजे रात्रीचा पती. म्हणजेच चंद्र.
गिरीश नावाचे कोण कोण प्रख्यात आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. गिरी म्हणजे पर्वत. गिरीश म्हणजे पर्वताचा मालक. म्हणजे शिवशंकर. बरेच लोक हे नाव 'गिरीष' असे लिहितात. त्याला काही अर्थ नाही.
अवनी म्हणजे पृथ्वी. अवनीश म्हणजे पृथ्वीचा पती. म्हणजे राजा.
एक प्रसिद्ध वृत्तनिवेदक आहेत रवीशकुमार. रवी म्हणजे सूर्य आणि रवीश म्हणजे सूर्य नावाचा ईश्वर. येथे 'सूर्याचा मालक' असा अर्थ घेता येत नाही.
जगत् म्हणजे दुनिया. जगदीश म्हणजे दुनियेचा मालक.
मोहनीश बहल नावाचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. मोहन नावाचा ईश्वर असा त्याचा अर्थ.
अंबरीश मिश्र नावाचे एक लेखक आहेत. अंबर म्हणजे आकाश आणि अंबरीश म्हणजे आकाशाचा पती. म्हणजेच सूर्य.
बाकी कवीश किंवा कवीश्वर म्हणजे काय याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.
ईश शेवटी असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा