4. आजचा शब्द 'हेम'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शब्द काय सांगतात
भाग ४
आजचा शब्द 'हेम'
हेम म्हणजे सोने. हा शब्द अनेक नावांमध्ये सापडतो.
लता म्हणजे वेल असेल तर हेमलता म्हणजे सोन्याची वेल.
हेमांगी म्हणजे सोन्यासारखे अंग असलेली.
हेमांग म्हणजे सोन्यासारखे शरीर असलेला. हेमांग म्हणजे सिंह असाही अर्थ होतो.
हेमकांती म्हणजे आंबा, हळद किंवा सोन्यासारखी चमकदार त्वचा.
हेमकिरण म्हणजे सोन्याचा किरण.
ज्याच्या पोटात सोने आहे तो हेमगर्भ. हा शब्द सूर्यासाठी वापरला जातो.
सोने, पारा आणि गंधकापासून आयुर्वेदात एक औषध बनवले जाते. त्यालाही हेमगर्भ म्हणतात. अगदी मरणाच्या दारात असलेल्या माणसाला हेमगर्भाची मात्रा देतात. या मात्रेने त्याच्यात थोडी धुगधुगी येते.
जिच्याकडे बरेच गुण आहेत तिला आपण गुणवती म्हणतो. त्याच नियमाने जिच्याकडे भरपूर सोने आहे तिला हेमवती म्हणतात. हेमवती हे देवी लक्ष्मीचे एक नाव आहे. म्हणून श्रीमंत माणसाला हेमवतीनंदन म्हणतात. म्हणजेच लक्ष्मीपुत्र.
तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जर माला म्हणजे माळ आणि मालिनी म्हणजे माळ घातलेली स्त्री. तर हेमामालिनी म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आता सहज देऊ शकाल.
असे हेमयुक्त अनेक शब्द आता तुम्हालाही आठवतील.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
- विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा