78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

33. आजचा शब्द 'पतन'.



पतन

पतन म्हणजे उतरणे, मावळणे, अवनति, र्‍हास.

माणसाच्या वागण्याचा दर्जा घसरला की त्याचे 'अधःपतन' झाले असे म्हणतात. 'उर्ध्वपातन' हा त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द. ज्या पाण्यात क्षार व इतर अशुद्धी असेल त्याला उष्णता देऊन त्याची वाफ करतात. ती वर जाणारी वाफ थंड करून तिचे पुन्हा पाणी बनवतात. हे शुद्ध पाणी असते. ही प्रक्रिया म्हणजे 'उर्ध्वपातन'. इंग्रजीत अशा पाण्याला डिस्टिल्ड वाॅटर  म्हणतात. (हे पाणी बॅटरीत टाकले जाते. दारू गाळण्यासाठीसुद्धा उर्ध्वपातन केले जाते. म्हणून दारूच्या कारखान्याला 'डिस्टिलरी' म्हणतात.)

पतन म्हणजे पडणे असाही अर्थ आहे. त्यावरून 'गर्भपात' असा शब्द आला. धबधब्यातून पाणी वेगाने खाली पडते म्हणून त्याला 'जलप्रपात' म्हणतात. खाली पडून नमस्कार केला की त्याला 'प्रणिपात' म्हणतात. हल्ला करणे, भेटणे, भिडणे म्हणजे 'संपात'. (जेव्हा बरोब्बर 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते तेव्हा 'वसंत संपात' किंवा 'शरद संपात' बिंदू असतो.) शत्रूचा नाश करणे म्हणजे 'निःपात'. 

पतन म्हणजे पडणे असले तरी 'उत्पात माजवणे' म्हणजे उड्या मारून धुमाकूळ घालणे.

पतनचा भूतकाळ 'पतित'. पतित म्हणजे पडलेला, पापी, भ्रष्ट. त्यालाही पवित्र, पावन करून घेणारा म्हणून 'पतितपावन सीताराम' असे श्रीरामाचे भजन केले जाते.

पत् धातू अलेले असे अनेक शब्द आपल्याला रोजच्या वापरात दिसतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.