78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

31. आजचा शब्द 'चल'

 


चल 

चल म्हणजे अस्थिर, हलणारा, क्षणिक, विनाशी.

बाजारात सतत चालते म्हणून पैशाला 'चलन' म्हणतात आणि नोटांना 'चलनी नोटा' म्हणतात. ज्याचे मन अस्थिर असते त्याला 'चंचल' किंवा 'चलचित्त' म्हणतात. चित्रपट म्हणजे चलचित्र. लक्ष्मी कधीच एका ठिकाणी स्थिर नसते म्हणून तिलाही 'चंचला' असे नाव आहे. 

जो केवळ चालवतो त्याला 'चालक' म्हणतात, तर जो नीटपणे चालवतो त्याला 'संचालक' म्हणतात. इंग्रजीत ज्याला ऑपरेटर म्हणतात तो 'परिचालक' असतो.

जे नियम, रूढी, कायदे सध्या वापरात असतात त्यांना 'प्रचलित' कायदे म्हणतात. 'चलचंचू' हे चकोर पक्षाचे एक नाव आहे. निस् हा उपसर्ग लागून 'निश्चल' असा शब्द बनतो. चलनी नोटा सरकारने बाद केल्या तेव्हा 'निश्चलनीकरण' असा शब्द 'प्रचलित' झाला.

अविचल, अचल म्हणजे स्थिर, न हलणारा. त्यामुळे पर्वताला 'अचल' म्हणतात. त्यावरून बर्फाचा पर्वत म्हणजे 'हिमाचल', विंध्य नावाचा पर्वत म्हणजे 'विंध्याचल'. 

अरुण हा सूर्याचा सारथी म्हटला जातो. त्याची किरणे भारतात पहिल्यांदा पडतात तो प्रदेश आहे 'अरुणाचल'. अरुणाचल प्रदेशातील ४०७० फूट उंचीवरील 'दांग' या ठिकाणी पहिला सूर्योदय होतो. हे एक पर्यटनस्थळ आहे.

'चल' धातूपासून बनलेले असे अनेक शब्द आपल्यापर्यंत रोजच चालत येतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.