78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

3.आजचा शब्द 'अद्रि'



 भाग ३

आजचा शब्द अद्रि.

अद्रि या शब्दाचा एक अर्थ 'पर्वत' असा होतो.

याला पर्वतांची नावे जोडून विन्ध्याद्रि, नीलाद्रि, हिमाद्रि आणि आपल्या सर्वात जवळचा सह्य नावाचा *सह्याद्रि*.

सह्याद्रि म्हणजेच *सह्य* नावाचा पर्वत. आपल्याला जर हे माहीत असेल तर आपण 'सह्याद्रि पर्वत' असा चुकीचा उल्लेख करणार नाही. 

अद्रि शब्दाला जोडून अद्रिराज म्हणजे हिमालय.

अद्रितनया , अद्रिनन्दिनी, अद्रिजा म्हणजे पार्वती. 

अद्रिशय्य म्हणजे शिव.

अशी अनेक समानार्थी नावे तयार होतात.

शेवटी 'अद्रि' असलेले अनेक शब्द आता तुम्हालाही आठवतील.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. 

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

- विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.