78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

27. आजचा शब्द 'वाद'

वाद

वाद म्हणजे मत, चर्चा, सिद्धांत, बातमी.

संवाद, विवाद, प्रवाद इत्यादी शब्द आपल्या ओळखीचे आहेत.

नियमात न बसणार्‍या गोष्टीला अपवाद म्हणतात. पण अपवाद म्हणजे निंदा, ठपका, शिवी, असेही अर्थ आहेत. त्यावरून 'लोकापवाद' असा शब्द वापरला जातो. लोक नेत्याची निंदा करतात तेव्हा त्याला लोकापवादास सामोरे जावे लागते. अशा वेळी 'वादग्रस्त' मुद्दे पुढे आणले जातात.

कोर्टात फिर्याद करणारा वादी आणि त्याला उत्तर देणारा प्रतिवादी असतो. सरकारला मोठा न्यायाचा सल्ला देणारा 'महान्यायवादी' म्हणजेच ॲटर्नी जनरल असतो. 

एका भाषेतील आशय दुसर्‍या भाषेत नेला की त्याला 'अनुवाद' म्हणतात. नीटपणे साधला तर संवाद, नाही तर 'विवाद' होतोच. वादाचा धुरळा उठतो तेव्हा वादंग माजते.

वाद म्हणजे 'आवाज' या अर्थावरून 'वादन' म्हणजे वाजणे असे नाम आणि वाजवता येते ते 'वाद्य' असे (कर्मणि विध्यर्थक धातुसाधित) विशेषण तयार होते. 

सिद्धांत किंवा मत या अर्थानुसार मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद, स्त्रीवाद, भांडवलवाद, असे अनेक शब्द वेगवेगळे 'इझम' घेऊन येतात.

अनेक ग्रंथ वाचून एखादा पंडित फारच वादविवाद करू लागला तर त्यास 'वादचंचू' म्हणतात.

वाद घालणारे असे अनेक शब्द आपण वापरतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.