24. आजचा शब्द 'भा'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भा
भा म्हणजे तेज, प्रकाश, कांती, सौंदर्य.
शोभा, प्रभा, आभा अशा अनेक नावांमध्ये हा धातू आहे. अमिताभ बच्चन यांच्या नावातही हाच धातू आहे.
'आभा किंवा आभ' म्हणजे तेजाचे वलय. त्यानुसार सुवर्ण + आभ म्हणजे सुवर्णाभ. त्याचा अर्थ सोन्यासारखे तेजस्वी वलय. अमित + आभ म्हणजे अमिताभ. अमर्याद तेजाचे वलय म्हणजे अमिताभ. हे गौतम बुद्धांचे एक नाव आहे. प्रभा म्हणजे प्रकाश आणि प्रभात म्हणजे पहाट.
एखाद्या व्यक्तीमध्ये बुद्धी किंवा कल्पनाशक्तीची चमक असेल तर तिला 'प्रतिभा' म्हणतात. प्रकाशित करणारा या अर्थामुळे सूर्याला भास्कर, प्रभाकर, भानु, विभाकर, विभावसु अशी नावे मिळाली. मात्र विभावरी म्हणजे रात्र.
सूर्यासाठी 'भाम' असेही एक नाव आहे. त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे 'भामा'. म्हणजे रागीट स्त्री. कृष्णाच्या एका पत्नीचे नाव सत्यभामा होते. या नावावरून तिच्या स्वभावाचा अंदाज येईल. 'भामिनी' या नावाचा अर्थही सुंदर किंवा रागीट स्त्री असा आहे.
भा या धातूने चमकणारे असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा