78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

22. आजचा शब्द 'चर'.

 


चर


चर म्हणजे हालणारा, सरकणारा, सचेतन.

भूचर, जलचर, खेचर, उभयचर हे सजिवांचे प्रकार आपण शाळेत शिकतो. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशात फिरतात त्यांना खेचर म्हणतात.

चराचर सृष्टी म्हणजे ज्यात चर आणि अचर अशा दोघांचाही समावेश होतो. रात्री भटकतात ते निशाचर. उंदीर, साप इत्यादी निशाचर प्राणी आहेत. गुप्तपणे फिरतो तो गुप्तचर. नेत्याच्या मागे मागे फिरतो तो अनुचर. फिरण्यासाठी उपयोगात येतात ते पाय म्हणजेच 'चरण'. 

जनावरे गवत खात फिरतात म्हणून त्याला मराठीत 'चरणे' म्हणतात. चरणे म्हणजे मुळात भटकणे, विचरण करणे.

एखाद्या मंदिरातील मूळ मूर्ती तशीच ठेवून त्यासारख्या दुसर्‍या मूर्तीची मिरवणूक काढतात. त्या दुसर्‍या मूर्तीला 'चरमूर्ती' किंवा उत्सवमूर्ती म्हणतात.

सोने, दागिने, पैसे अशा जंगम मालमत्तेला 'चरद्रव्य' म्हणतात. 

या सर्व शब्दांच्या मागे 'चर्' हा धातू आहे. 

याला विविध उपसर्ग लागतात आणि विचार, आचार, समाचार, उच्चार, संचार, दूरसंचार, उपचार, प्रचार, असे अनेक शब्द तयार होतात.

चर् धातूला परि हा उपसर्ग जोडला की 'परिचर' असा शब्द बनतो. परिचर म्हणजे सेवाशुश्रुषा करणे. त्यावरून नर्सला 'परिचारिका' असे नाव मिळाले.

आचार शब्दाला जोडून भ्रष्टाचार, शिष्टाचार, कुलाचार असे असंख्य संस्कृत शब्द आपण रोजच वापरतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.