21. आजचा शब्द 'कल्प'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कल्प
कल्प म्हणजे शक्य, योग्य, समर्थ, नियम, निश्चय इत्यादी.
विचारपूर्वक निश्चय केला तर त्याला 'संकल्प' म्हणतात. निर्णय घेताना मनात शंका, पर्याय असेल तर त्याला 'विकल्प' म्हणतात.
एखादे काम पुढे घेऊन जायचे असेल तर तो 'प्रकल्प' होतो.
(इंग्रजीतही त्याला 'प्रो' हा उपसर्ग लावून 'प्रोजेक्ट' म्हणतात.)
कल्पन म्हणजे कापणे, रचना करणे. कात्रीसाठी कल्पनी असा शब्द आहे. त्यामुळे कात्रीने विविध केशरचना करणारे न्हावी 'कल्पक' किंवा 'कल्पकार' असतात.
कल्पनेतील वस्तू देणारे काल्पनिक झाड म्हणजे कल्पवृक्ष, कल्पतरु. इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक वेल म्हणजे कल्पलता.
या सर्व शब्दांमागे 'क्लृप' हा धातू आहे. क्लृप म्हणजे कल्पना करणे. 'क्लृप्ती' म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी लढवलेली कल्पना (जुगाड).
कल्प म्हणजे चार अब्ज बत्तीस कोटी वर्षे असाही अर्थ आहे. कल्पांत म्हणजे जगाचा प्रलय.
(वेदांच्या सहा अंगांपैकी एकास 'कल्प' असे नाव आहे.)
कल्पनेची भरारी घेणारे असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा