2. आजचा शब्द 'अक्षि'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाग २
(आजचा शब्द अक्षि)
अक्षि म्हणजे डोळा.
याचा इतर शब्दांशी समास झाला की शेवटी 'अक्ष' होतो.
उदाहरणार्थ कमलाक्ष म्हणजे कमळासारखे डोळे असलेला.
कमलाक्षी म्हणजे कमळासारखे डोळे असलेली.
विशालाक्ष म्हणजे मोठे डोळे असलेला.
विशालाक्षी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप.
रुद्राक्ष म्हणजे रुद्राचा डोळा.
एकाक्ष म्हणजे एक डोळा असलेला (कावळा).
कटाक्ष म्हणजे दृष्टि टाकणे किंवा तिरप्या नजरेने पाहणे.
हरिणाक्षी म्हणजे हरणासारखे डोळे असलेली.
मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असलेली.
याच चालीवर एखाद्या पुरुषाचे डोळे हरणासारखे किंवा माशासारखे असतील तर त्याला 'हरिणाक्ष' किंवा 'मीनाक्ष' असेही म्हणता येईल.
वरील शब्दांकडे पाहताना तुमची दृष्टी आता नक्कीच बदलली असेल.
शेवटी 'अक्ष' असलेले अनेक शब्द आता तुम्हाला आठवतील.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात.
आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
ज्ञानाचे तेज आपल्या डोळ्यांत चमकू लागते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
***
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा