78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

17. आजचा शब्द 'ताप'.



ताप

ताप म्हणजे उष्णता, दुःख, ज्वर, आपत्ती, संकट.

आयुष्यात चुकीचा निर्णय घेतला की, त्याचे परिणाम भोगताना पश्चात् + ताप म्हणजे पश्चात्ताप होतो. 

(पश्चात् म्हणजेच 'नंतर'. त्यामुळे 'नंतर पश्चात्ताप झाला' असे म्हणणे चूक आहे.) पश्चात्ताप आणि अनुताप सारखेच.

क्रोधाला 'संताप' म्हणतात. तो योग्य कारणासाठी असेल तर 'सात्विक संताप' म्हणतात. 

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तीन ताप सहन करावे लागतात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. यांना त्रिविधताप म्हणतात.

अज्ञान, मूर्खपणा, राग, द्वेष, रोग यामुळे स्वतःला होतो तो आध्यात्मिक ताप.

शत्रु, प्राणी किंवा इतरांमुळे होतो तो आधिभौतिक ताप.

आणि दुष्काळ, भूकम्प, पूर वगैरेमुळे होतो तो आधिदैविक ताप.

पराक्रम गाजवला की त्याला 'प्रताप' म्हणतात. (काही उलटेसुलटे काम करून ठेवले की मराठीत उपरोधाने 'प्रताप  करून ठेवले' असे म्हणतात.)

तापस म्हणजे तप करणारा तपस्वी. तप करणारी स्त्री असेल तर तिला 'तापसी' म्हणतात. हे एका अभिनेत्रीचेही नाव आहे. तापन किंवा तपन म्हणजे सूर्य. (तपन सिन्हा हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत.)

तापात ताप एखादे काम करताना कधी कधी डोक्याला ताप होतो ती गोष्ट वेगळी.

तापमान वाढलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.