15. आजचा शब्द 'वह्'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वह्
वह् या धातूचा मुख्य अर्थ वाहून नेणे.
काळजी घेणे, बाळगणे असेही त्याचे इतर अर्थ आहेत.
वह् या धातूपासून वाहन, प्रवाह, वाहिनी असे अनेक शब्द तयार होतात.
बसमध्ये तिकिटे फाडून जो आपल्या कर्तव्याचे वहन करतो तो वाहक. म्हणजे कंडक्टर. परि म्हणजे सगळीकडे आणि वहन म्हणजे वाहून नेणे. अर्थात 'परिवहन महामंडळ' म्हणजे सगळीकडे प्रवासी वाहून नेणारे महामंडळ.
पुढे वाहत जातो तो प्रवाह. वाहून नेते ती वाहिनी.
अनेक वाहने रस्त्यावर आली की ती वाहतूक.
'विवाह' या शब्दातही वह् धातू आहे. नवरीला सासरी मेण्यात बसवून वाहून नेले जात होते. त्यावरून 'विवाह' शब्द रूढ झाला. ज्याच्याशी वैवाहिक संबंधामुळे नाते असते तो वैवाही म्हणजेच 'व्याही'.
एखाद्या उंच इमारतीत गेलात तर लिफ्टच्या बाजूला 'उद्वाहन' असे लिहिलेले दिसेल. उद् म्हणजे वर आणि वाहन म्हणजे घेऊन जाणारे साधन.
मात्र बोलावण्यासाठी किंवा अपील करण्यासाठी 'जाहीर आवाहन' करतात. यातही वह् धातू आहेच.
कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याचे 'निर्वहन' करण्याची शपथ घेतात.
वह् धातूने वाहून नेलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा