78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

13. आजचा शब्द 'इंद्र'.


इंद्र

इंद्र म्हणजे राजा, श्रेष्ठ, वरिष्ठ, नायक, मुख्य, पुढारी.

यापासून रवींद्र, कवींद्र, फणींद्र अशी अनेक नावे तयार होतात.

रवींद्र म्हणजे रवी नावाचा राजा. अर्थात सूर्य. कवींमध्ये श्रेष्ठ तो कवींद्र. फणा काढणार्‍या सापांचा राजा तो फणींद्र.

महि म्हणजे पृथ्वी आणि 'महीन्द्र' म्हणजे पृथ्वीचा राजा. या नावाची जीपगाड्या बनवणारी एक कंपनी आहे.

महेंद्र आणि महींद्र ही दोन वेगळ्या अर्थाची नावे आहेत. महा + इंद्र हा महेंद्र आहे. याचा अर्थ महान राजा.

(त्याच्या बाहूमध्ये बळ असेल तर त्याला महेंद्र बाहूबली म्हणतात.)

पंजाबी नावे अमरिंदर, सुरिंदर यामध्येही हा इंद्र आहे. (मात्र मराठीतील 'दलिंदर' या विशेषणाशी 'इंद्र'चा संबंध नाही. त्याचा संबंध दारिद्र्याशी आहे.)

इंद्राच्या पत्नीचे नाव शचि. त्यावरून 'शचींद्र" असेही नाव इंद्राला मिळाले. याच शचींद्र चे नंतर शचीन झाले. शेवटी ते 'सचिन' या नावावर येऊन स्थिरावले. 

बाकी देवांचा राजा 'देवेंद्र' आणि माणसांचा राजा 'नरेंद्र' हे अर्थ तुम्हाला माहीतच आहेत.

इंद्र असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.