78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

10. आजचा शब्द 'भद्र'


भद्र

भद्र म्हणजे सुखी, धन्य, श्रेष्ठ, सुंदर, कल्याण.

हा शब्द अनेक रूपांमध्ये लोक आजही वापरतात.

भद्रा हे त्याचे स्त्रीलिंगी रूप. 'सुभद्रा' हे मुलीचे नाव आपल्या परिचयाचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत 'मुद्रा भद्राय राजते।' असे वाक्य आहे. 'ही राजमुद्रा कल्याणासाठी विराजमान आहे' असा त्याचा अर्थ.

दोन वाईट माणसे एकत्र आली की 'अभद्र युती' झाली असे म्हणतात. मात्र दोन विरोधी विचारांचे राजकीय पक्ष एकत्र आले की इतर पक्ष 'अभद्र युती' अशीच टीका करतात.

खुलदाबादचे 'भद्र मारुती' हे देवस्थान भारतात प्रसिद्ध आहे. भद्रसेन राजाच्या भद्रावती नगरीतील हा भद्र मुद्रेतील मारुती आहे.

संस्कृतमध्ये 'हे भद्र' म्हणजे 'हे भल्या माणसा'. पूर्वी सभेमध्ये 'भद्र जनहो' असे म्हणायची पद्धत होती. सिंहासनाला भद्रासन असेही म्हणतात. 

शिवाचे एक उग्र रूप न्हणजे वीरभद्र आणि त्याची पत्नी भद्रकाली. भद्रा म्हणजे गाय किंवा स्वर्गातील गंगा असेही अर्थ सापडतात.

(मात्र पंचांगातील 'भद्रा' हे वेगळेच प्रकरण आहे.)

भद्र असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.