1. आजचा शब्द 'आकर'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शब्द काय सांगतात?
भाग १
'आकर'
आकर या शब्दाचे अर्थ खाण, उत्पत्तिस्थान, समूह असे आहेत.
याला रत्न हा शब्द जोडला की 'रत्नाकर' हा समास होतो. रत्नाकर म्हणजे रत्नांचा खजिना. हा शब्द समुद्रासाठी वापरला जातो.
'आकर'लाच पद्म हा शब्द जोडून पद्माकर म्हणजे कमळांनी भरलेले तळे असा अर्थ होतो.
यालाच 'करुणा' हा शब्द जोडून 'करुणाकर' म्हणजेच करुणेची खाण हा शब्द ईश्वरासाठी वापरला जातो.
यालाच 'प्रभा' हा शब्द जोडून 'प्रभाकर' हे नाव बनते.
प्रभा म्हणजे तेज, कांती, किरण. आणि प्रभाकर म्हणजे तेजाची खाण. हा शब्द सूर्यासाठी वापरला जातो.
वरील शब्दांकडे पाहण्याची तुमची दृष्टी आता बदलली असेलच. शेवटी 'आकर' असलेले अनेक शब्द आता तुम्हालाही आठवतील.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
- विनोद जैतमहाल.
संस्कृत वर्गाचा डेमो व्हिडिओ आणि अधिक माहितीसाठी संपर्कः
9823028332 Whatsapp.
***
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा